Corona Update: आज नागपुरात ३५६ कोरोना पॉझिटिव्ह तर ११ जणांचा मृत्यू  

new 356 corona positive in Nagpur today
new 356 corona positive in Nagpur today
Updated on

नागपूर ः जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांचा टक्का वाढला आहे. रुग्णवाढीचा क्रम मंगळवारीही कायम असून ७ हजार चाचण्या झाल्या असून ३५६ नवीन बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९ हजार ५६१ वर पोहचली आहे. तर २४ तासांत ११ जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा ३ हजार ६१५ झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या ३५६ रुग्णांमध्ये शहरातील २६६ तर ग्रामीण भागातील ८६ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात ८६ हजार ४८६ तर नागपुरातील १३ तालुक्यांमध्ये २२ हजार ४०३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जिल्हाबाहेरच्या ६७२ कोरोनाबाधितांना आतापर्यंत नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्ससह खासगीत रेफर करण्यात आले. 

जिल्ह्यामध्ये ७ हजार १८४ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ६ हजार ८२८चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्या आहेत. सर्वाधिक १ हजार ८७४ चाचण्या या खासगीत झाल्या आहेत. तर ९० जण बाधित असल्याचे आढळून आले. आज एम्समध्ये १४, मेडिकलमध्ये ६७, मेयोत ३२, माफसूत ९, नीरीत ५३ तर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २७ जण बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून पुडे आला आहे. तर ॲन्टिजेन चाचणीतून ४४ जण बाधित आढळले. कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या टक्केवारीत प्रचंड घट झाली असून कोरोनामुक्तांचा दर ९२ टक्क्यांवर आला आहे.

मागील ९ महिन्यात नागपूर जिल्ह्यात साडेसात लाखाजवळ चाचण्या पोहचल्या आहेत. यातील आरटी पीसीआर चाचण्यांची संख्या ४ लाख १७ हजार ६४१ आहे. तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या ३ लाख २५ हजार ३९३ वर पोहचली आहे. अशा एकूण साडेसात लाखाजवळ चाचण्यांची संख्या पोहचली आहे.

ग्रामीण भागात कोरोनामुक्तांची संख्या वाढली

मंगळवारी कोरोनामुक्तांची संख्या अवघी १३३ आहे. विशेष असे की, आज शहरापेक्षा ग्रामीण भागातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरातील ६० तर ग्रामीण भागातील ७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ लाख १ हजार ६०१ जणांना कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील ८० हजार२३० जण तर २१ हजार ३७१ जण ग्रामीण भागातील आहेत.

रुग्णालयांतील बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ

जिल्ह्यात गृहविलगीकरणासहीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. सद्या रुग्णालयातील संख्या १ हजार ४३७ वर पोहचली आहे. तर गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या २ हजार ९०८ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हायात कोरोनाबाधितांची संख्या आता ४ हजार ३४५ वर पोहचली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()