नागपूर : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देण्यास महापालिकेने आता प्राधान्य दिले असून ५१ केंद्र सुरू करण्याची तयारी केली. यातील १० केंद्र सुरू करण्यात आले आहे तर २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री ऑपरेटर तसेच अन्य सोयीसुविधांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून तेही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
नवीन ५१ लसीकरण केंद्रांमध्ये लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनमध्ये प्रत्येकी ७, हनुमाननगर, धंतोली, गांधीबाग, लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी ५, नेहरूनगर व आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी ४, सतरंजीपुरा झोन ३ आणि मंगळवारी झोनमध्ये ६ केंद्रांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांत हे सर्व केंद्र सुरू करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
झोननिहाय ५१ लसीकरण केंद्र
लक्ष्मीनगर झोन : प्रभाग क्रमांक ३६ मधील राजीनगरातील श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन, सोनेगांव समाज भवन, दुर्गा मंदिर जवळ, प्रभाग १६ मधील विवेकानंदनगरातील क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, गजानननगरातील समाजभवन, प्रभाग ३७ मध्ये गायत्रीनगरातील स्केटिंग हॉल, सुभाषनगरातील शितला माता मंदिरच्या बाजूला महात्मा गांधी समाजभवन, प्रभाग ३८ मध्ये शिवणगावातील मनपा शाळा.
धरमपेठ झोन : जगदीशनगरातील समाज भवन सभागृह, समाज भवन सभागृह, तेलंगखेडीतील आयुर्वेदिक रुग्णालय, सदरमधील शितला माता मंदिर समाज भवन, टिळकनगरातील समाज भवन, धरमपेठेतील व्हीआयपी रोडवरील डिक दवाखाना, सीताबर्डी टेम्पल रोडवरील बुटी दवाखाना.
हनुमाननगर झोन : प्रभाग ३१ मधील शिवनगरातील आजमशाह शाळा, प्रभाग ३२ मधील दुर्गानगर शाळा, प्रभाग ३४ मधील जानकीनगरातील विठ्ठलनगर गल्ली क्रमांक १, शाहूनगरातील मानेवाडा यूपीएचसी, प्रभाग २९ मध्ये म्हाळगीनगर शाळा.
धंतोली झोन ः प्रभाग १७ मधील गणेशपेठ येथील साखळे गुरुजी शाळा, राहुल संकुल समाजभवन, प्रभाग ३५ मधील अजनीतील सेंट्रल रेल्वे रुग्णालय, मनीषनगरातील दुलाबाई काचोरे ले-आऊटमधील गजानन मंदिर समाजभवन, वर्धा रोडवरील चिचभवन मनपा शाळा.
नेहरूनगर झोन : वाठोडा येथील गोपालकृष्णनगरातील शीतला माता मंदिर समाजभवन, नंदनवन पोलिस स्टेशनजवळील शिव मंदिर समाजभवन, चिटणीसनगरातील कामगार कल्याण कार्यालय, बिडीपेठमधील इंदिरा गांधी समाजभवन.
गांधीबाग झोन ः प्रभाग ८ मधील अन्सार समाजभवन, टिमकीतील नेताजी दवाखाना, मोमीनपुरा मनपा शाळा, प्रभाग १९ मध्ये भालदारपुरा गंजीपेठ रोडवरील मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रभाग २२ मधील इतवारी शहीद चौकातील दाजी दवाखाना.
सतरंजीपुरा झोन : भारत माता चौकातील जागनाथ बुधवारी प्राथमिक मुलींची शाळा, लालगंज येथील बारईपुरा येथील मेहंदीबाग प्रा. शाळा, कुंदनलाल गुप्तानगर मनपा शाळा.
लकडगंज झोन : प्रभाग ४ मधील भरतवाडा प्रा. शाळा, जुना कामठी मार्गावरील कळमना प्राथमिक शाळा, प्रभाग २३ मधील सतनामीनगर समाजभवन, प्रभाग २४ मधील मिनिमातानगर प्रा. शाळा, प्रभाग २५ मधील सुभाष चौकातील पारडी मनपा प्राथमिक शाळा.
आशीनगर झोन : प्रभाग क्रमांक ६ मधील वैशालीनगर हिंदी उच्च प्रा. शाळा, प्रभाग ३ मधील विनोबा भावेनगरातील वांजरी हिंदी प्रा. शाळा, प्रभाग २ मधील ठवरे कॉलनीतील ललितकला भवन, प्रभाग ७ मधील आशीनगरातील एम.ए.के. आझाद हिंदी उर्दू शाळा.
मंगळवारी झोन : नागसेननगरातील भीम चौकात शक्यमुनी समाजभवन, जरिपटकातील संत रामदास धर्मशाळा, मोहननगरातील सेंट जॉन प्रायमरी स्कूल, गोरेवाडा रोडवरील पटेलनगरातील बोरगांव हिंदी प्रा. शाळा, जाफरनगरातील प्रशांतनगर मनपा ऊर्दु उच्च शाळा, गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.