कामठी (जि.नागपूर) : सदया कोरोना म्हणताच भल्याभल्यांची भंबेरी उडते. कोरोनाबाबत समाजमाध्यमांतून गैरसमज पसरविण्यात येत आहे. घरात, मोहल्ल्यात कोणी कोरोनाबाधित आढळला तर आयुष्यभर कमाविलेली इज्जतच एका झटक्यात धोक्यात येते. दरम्यान क्वारंटाईन काळात "पॉझिटिव्ह' असलेला रूग्ण व त्याच्या कुटुंबासोबत समाजाकडून जी वागणूक मिळते ते सांगण्याची सोय नाही. त्याच्याकडे मोठा गुन्हा केल्याच्या अविर्भावात बघीतले जाते. या प्रकाराला त्रासून"कोरोनासे नही, क्वारंटाईनसे डर लगता है साहाब', अशी भावना अनेक ठिकाणी सदया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : तरीही...टोलनाक्यावर होते, सक्तीची वसुली...
रूग्णाबरोबर कुटुंबीयांनाही भरते धडकी
13 एप्रिल रोजी कामठी शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. सात जुलैला कामठी शहर हे "कोरोनामुक्त' झाल्याचे ठरले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी कामठी येथील कोळसाटाल परिसर रहिवासी व बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीत काम करणारा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील आलेले कामगार व नागरिकसुदधा कोरोनाबाधित आढळले. तसेच हरदास नगर येथील रहिवासी व खैरी येथील एका मूर्ती कंपनीत काम करणारी एक महिला पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेले सुदधा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानुसार कोरोणाचा जणू काही उद्रेकच झाला. त्यामध्ये काही चिमुरडीे बालकेसुद्धा आढळली. कुठे चिमुकली बाळ पॉझिटिव्ह तर आई निगेटिव्ह आल्याचा प्रकार सुदधा आढळलेला आहे. वास्तविकता ही वाढत असलेली कोरोनाबाधित साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजनातून सोशल डिस्टनसिंग तसेच मास्क वापरणे अनिवार्य केले असले तरी कोरोना रुग्ण तपासणी अहवालात पॉझिटिव्ह अहवाल येताच त्या रुग्णाच्या घरी पोलिसांची गाडी, तहसिल प्रशासनाच्या ताफ्यासह आरोग्य विभागाचे पथक व रुग्णवाहिका येते. दरम्यान वस्तीतील नागरिक जणू काय घडले अशा विचित्र नजरेने पाहतात. मोबाईलच्या चित्रफितीत काढून "अपलोड' करतात. त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्याच्या प्रत्यक्षात आलेल्यांना विलीगीकरण कक्षात हलविले जाते तर कोरोनाबाधित रुग्णाला नागपूरला पाठविले जाते. या दरम्यान14 दिवसांचा कालावधी हा घरापासून दूर काढावा लागतो. त्यामध्ये कित्येक जण हे मानसिक तणावात असतात. परिणामी कोरोना झाला म्हटलं की बेईज्जतीच्या दारात उभे झाल्याचे जाणवते. त्यातच कोरोनटाईन पद्धत ही संशयितांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याने कित्येक नागरिक हे कोरोनाच्या भीतीने नव्हे तर क्वारंटाईनच्या भीतीने स्वतःची टेस्ट करायला घाबरत आहेत. त्यामुळे "कोरोना से नहीं तो क्वारंटाईनसे डर लगता है, साहब! अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांत दिसून येत आहे. तालुका प्रशासनाने या "कोरोना' व "क्वारंटाईन' या एकाच सिक्याच्या दोन बाजू असलेल्या परिस्थितीची जाणीव करून घेत कोरोणाबाधित रुग्णासह संशयीतसंसाठी त्यांच्या स्वगृही वा स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा पुरविल्या जाण्याची मागणी सर्वसामान्य जागरूक नागरिकांनी केली आहे.
अधिक वाचा :खुद्द दोन पोलिस कर्मचारी अडकले जाळयात, काय केले होते त्यांनी...
शासनाचे आदेश पाळा
मागील एक आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने हा विषय गांभीर्याने घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस व जिल्हाधिका-यांनी दिलेल्या गाईडलाइननुसार विविध उपाययोजना केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेला गती देत विना मास्क लावून वावरणाऱ्या नागरिकांना दंड, संशयीतांची कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणी, बाजारातील गर्दी टाळण्यासाठी सुद्धा उपाययोजना आखणे सुरू आहेत. सोमवारपासून कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजी बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. खैरी येथील अपकॉन मूर्ती कंपनीतील कामगार बाधीत होत असल्याने खबरदारी म्हणून तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कंपनी पुढील दहा दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खैरीचे सरपंच मोरेश्वर ऊर्फ बंडू कापसे यांनी दिली.
अधिक वाचा : धक्कादायक : जिल्हयातील "हे' तालुके ठरले सदया "टॉपर', कशात ते वाचा...
घरोघरी होतेय सर्वेक्षण
सध्या घरोघरी सर्वेक्षणाकरीता कर्मचारी येत असून प्रत्येक नागरिकांनी त्यांना सत्य माहिती द्यावी, काही लक्षणे असल्यास वेळेवर तपासणी करता येईल व यामुळे होणारा प्रादुर्भाव थांबविण्यात यश मिळेल. अन्यथा नागरिकांना "लॉकडाउन'ला सामोरे जावे लागणार. कोणत्याही नागरिकांनी माहिती देताना असलेला त्रास न लपविता निर्भीडपणे सर्वेक्षण करण्या-या कर्मचा-यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, नगराध्यक्ष मोहम्मद शहजहा शफाहत व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.