नागपूरच्या आपली बसमध्ये तैनात राहणार बाऊंसर्स...हे आहे कारण

bauncer
bauncer
Updated on

नागपूर : भ्रष्टाचार कोण आणि कसा करेल आणि पैशांच्या लोभासाठी कुठल्या थराला जाईल, काहीच सांगता येत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या आपली बसमध्येही वाहकांच्या भ्रष्टाचाराने कहर केला आहे. त्यामुळे बाऊंसर्स नेमण्याची वेळ आता परीवहन मंडळावर आली आहे.
आपल्या बसचे काही वाहक प्रवाशांना पैसे घेऊन तिकीट देत नाहीत. तपासणी पथकावर निगराणी ठेवण्यासाठी त्यांनी एक व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला आहे. तपासणी पथक येताच गुंडांचे टोळके येऊन त्यांना धमक्‍या देतात. काहींना मारहाणसुद्धा करण्यात आली आहे. याची तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे तक्रारी करण्यात आली आहे. त्यांनीही सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान व्हॉट्‌सऍप ग्रुपची तपासणी केली असताना आपली बसचे वाहक, चालक यांच्यासोबतच डीम कंपनीच्या तपासणी पथकात समावेश असलेल्या काहींची मोबाईल नंबर त्यात आढळले आहेत. तपासणीचा धडाका लावल्यापासून दररोज पंचेवीस ते तीस लाखांचे उत्पन्न परिवहन समितीला होऊ लागले आहे, याकडेही सभापती बोरकर यांनी लक्ष वेधले.
आपली बसच्या तपासणी पथकांना धमक्‍या देणाऱ्या व त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता बाऊंसरची नेमणूक केली जाणार आहे. रोज शंभर बसची तपासणी करून तिकिटाचे पैसे शिखात घालवणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.

आपल्या बसच्या तिकिट तपासणीचे कंत्राट डीम कंपनीला दिले आहे. त्यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकेमार्फत दर महिन्याला दीड कोटी दिले जाते. गलेलठ्ठ वेतन घेणारे कंपनीचे अधिकारी दिल्लीत बसून कारभार बघतात. येथे नेमलेल्यांना पंधरा ते वीस हजार रुपये वेतन दिले जाते. दीड कोटींपैकी तीस ते चाळीस लाख वेतनावर खर्च केला जातो. उर्वरित पैसे कंपनीच्या घशात जात आहे. याशिवाय आजवर तिकिटांच्या काळाबाजारावर कंपनीला नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे डिमचे कंत्राटच रद्द करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला.

81 वाहकांचे आयडी लॉक
बस तपासणीची एकमेकांना सूचना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील 22 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये तपासणी पथकातील डीम्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय 81 वाहकांचे आयडी लॉक करण्यात आले आहे. यापैकी दोन वाहकांकडे अतिरिक्त पैसे आढळले तर उर्वरितांनी पैसे घेऊन प्रवाशांना तिकिटच दिले नव्हते.

वाहकाला तिकीट मागा
परिवहन समितीचे सभापती तसेच कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर मोरभवन येथे प्रवाशांसोबत संवाद साधला. आपली बसमध्ये बसतानाचा वाहकाला तिकिट मागा. अनेक वाहक पैसे घेतात मात्र तिकीट देत नाही. सर्व पैसे त्यांच्या खिशात जातात. त्यामुळे परिवहन समितीला नुकसान होत आहे. हा सर्व आपलाच पैसा आहे. तो वाहतूक व्यवस्थेवरच खर्च केला जातो. त्यामुळे वाहकाला अवश्‍य तिकीट मागा असे आवाहन बोरकर यांनी प्रवाशांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.