उपराजधानीतील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा वाढतोय बोलबाला; विद्यार्थ्यांना मिळाले ४४ लाखांपर्यंत पॅकेज

Number of Engineering colleges is increasing in Nagpur
Number of Engineering colleges is increasing in Nagpur
Updated on

नागपूर,  ः अभियांत्रिकीसारख्या व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या aनागपूर विभागातील ४३ टक्के विद्यार्थ्यांना ४४ लाखांपासून तर दीड कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा हा याचा पुरावा असल्याचे तंत्र शिक्षणाचे विभागीय सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी सांगितले.

नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होत असून ४४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात १७ हजार १३६ जागांसाठी दरवर्षी प्रवेश होतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२०मध्ये ९ हजार२८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या ४४ महाविद्यालयात आज ४ हजार ३२७ शिक्षक असून यातील ८१३ शिक्षक हे आचार्य पदवीधारक असल्याचे डॉ. निबुदे यांनी सांगितले. 

या अनुभवी शिक्षकांच्या जोरावर दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या निकालामध्ये वाढ होत असून विभागासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. ४४ म्हणून ३२ महाविद्यालयांनी ‘नॅक’चे मूल्यांकन केले असून अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ८३ टक्के असल्याचे आहे. केवळ उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का मोठा नसून दरवर्षी ११३३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येतात.

मागील वर्षी अंतिम वर्षाच्या १३ हजार १९९ विद्यार्थ्यांमधून ५ हजार ७८६ म्हणजे ४३ टक्के विद्यार्थ्यांची निवड विविध संस्थांमध्ये उच्च पदांवर झाली होती. यात शासकीय अभियांत्रिकीसह काही संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ४४ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळवल्याचे डॉ. निबुदे यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.