हे विघ्नहर्ता, बाप्पा ! आतातरी कापसाचे पैसे खात्यात जमा होऊ द्या ना !

O disruptor, Bappa! Let the cotton money be credited to the account soon!
O disruptor, Bappa! Let the cotton money be credited to the account soon!
Updated on

जलालखेडा( जि.नागपूर) : नरखेड तालुक्याच्या शेतकऱ्यांनी मोगरा येथील कापूस पणन महासंघ या शासनाच्या कापूस संकलन केंद्रावर कापूस टाकला. काही दिवसातच कापसाच्या चुकाऱ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळते करणे आवश्यक होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कापूस पणन महासंघाने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा न केल्यामुळे सरकारच्या उदासीन धोरणाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. खरीपाची पेरणी झाली, नागपंचमी गेली, रक्षाबंधन पार पडले, पोळा झाला, आता गणपती आले, पण कापसाचे पैसे मात्र आले नाही. आता शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे चुकारे केव्हा मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

अधिक वाचाः व्वा रे कोरोना... आयटीआयच्या 20 हजार विद्यार्थ्यांवर आणली ही वेळ…

एक महिन्याच्या कालावधीत पैसे वळते करणे होते गरजेचे
नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन सीसीआयच्या व एक कापूस पणन महासंघाच्या सरकारी कापूस संकलन केंद्रावर १ लाख ८० हजार क्विंटल कापूस विक्री केला. कापूस टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व नियम अटींची पूर्तता करून सातबारा, बँक पासबुक, आधारकार्ड व आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. सीसीआयला कापूस विकल्याची रीतसर पावतीही शेतकऱ्याला देण्यात आली. सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात चार ते आठ दिवसात जमा केले. पण कापूस पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाचे २४ जून पासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. शासनाच्या नियमानुसार एका महिन्याच्या कालावधीत सबंधित शेतकऱ्‍यांच्या बँक खात्यात कापसाच्या चुकाऱ्‍याचे पैसे वळते करणे आवश्यक होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कापूस पणन महासंघाने शेतकऱ्‍यांच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा केले नाही. त्यामुळे शेतकरी कापूस पणन महासंघाच्या सबंधित अधिकाऱ्‍यांना अनेकदा विचारणा करीत आहे. मात्र आज-उद्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा होईल, असे उत्तर मिळत आहे.
हेही वाचाः समाजमन सुन्न! तिघांचेही मृतदेह एकामागे एक अन् नातेवाईक हुंदके देत फोडीत होते हंबरडा
 

शेतीसाठी आहे पैशाची गरज
नरखेड तालुक्यात यावर्षी शासकीय हमीभावाने १ लाख ८० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली. तीन केंद्रावर ही खरेदी करण्यात आली. यात मोगरा येथे कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी केली. याठिकाणी कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना २४ जूनपासून कापसाचे चुकारे मिळाले नाही. यामुळे सीसीआयला कापूस विकणारा शेतकरी फायद्यात राहिला व आपण कापूस पणन महासंघाला कापूस विकून घोडचूक केल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आता सध्या शेतीसाठी पैशाची गरज असतानादेखील कापसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतीसाठी व सणासाठी त्याला पैशाची गरज असाताना देखील कापसाचे पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना याच्या त्याच्या पुढे हात पसरावे लागत आहे. कोरोनामुळे अधिकारी व कर्मचारी यांचा मार्च महिन्याचा पगार कापण्यात आला होता. पण आता तो पगार देण्याचे परिपत्र निघाले. पण शेतकऱ्यांनी घामातून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याचे पैसे देण्याचा आदेश मात्र निघाला नाही. यामुळे शासन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का, हा खरा प्रश्न आहे.

विरोधक कुंभकर्णी झोपेत
शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील पिक विमा मिळाला नाही. कर्जमाफीत नाव असतानादेखील बँक पिक कर्ज द्यायला तयार नाही. अनेकांना पिक कर्जासाठी कागदपत्रे देऊन दीड महिना होत आला तरी पिक कर्ज मिळाले नाही. आता कापसाचे चुकारे ही दीड महिन्यापासून मिळाले नाही. तरी मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. सत्ताधारी सत्तेत खुश आहे व विरोधक कुंभकर्णी झोपेत आहे. तर मग शेतकऱ्यांना वाली कोण, हा खरा प्रश्न आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.