VIDEO : उमरेडच्या ध्येयवेड्या लेकीची यशोगाथा! दिल्लीत उमटवला ठसा; झाली सुप्रीम कोर्टाची वकील

नुकताच ६ मार्च रोजी नवी दिल्लीच्या हॉटेल ताज ॲम्बेसिडर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राईझींग वुमन संस्थेच्या वतीने ओमिताला इंस्पायरिंग वुमन पुरस्कार बहाल करण्यात आला .
नुकताच ६ मार्च रोजी नवी दिल्लीच्या हॉटेल ताज ॲम्बेसिडर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राईझींग वुमन संस्थेच्या वतीने ओमिताला इंस्पायरिंग वुमन पुरस्कार बहाल करण्यात आला .
Updated on

उमरेड (जि. नागपूर) : ती सर्वोच्च न्यायालयाची वकील कायदेतज्ञ , प्रोजुरीस लीगल लॉ फर्म या कंपनीची भागीदार , दिल्ली हुमन राईट कौन्सिलच्या राज्याच्या अध्यक्षा अशी बरीच बिरुदे आपल्या नावापुढे लावणारी उमरेड ची ओमिता उन्नरकर एका सर्वसाधारण  गुजराती कुटुंबात जन्माला आलेल्या ओमिताने देशाच्या राजधानीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आपल्या ध्येयाच्या कक्षेबाहेर भटकणाऱ्या अनेक तरुणींना एक नवा पायंडा घालून दिलाय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ओमिताचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे घरातून फारसं स्वातंत्र्य मिळाले नसले तरी तिने आपल्या अचाट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिल्ली काबीज केली . नुकताच ६ मार्च रोजी नवी दिल्लीच्या हॉटेल ताज ॲम्बेसिडर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राईझींग वुमन संस्थेच्या वतीने ओमिताला इंस्पायरिंग वुमन पुरस्कार बहाल करण्यात आला .

वकील व्हावे ही ईच्छा लहानपणापासूनच ओमीताच्या मनात घर करून होती , पण घरात सर्वांना वाटायचे की तिने डॉक्टर व्हावे , सातवी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी वडील बाहेर जाऊ देणार नसल्याने तिला बारावी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण करावे लागले , अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ओमिताने बारावी विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले पण पुढे तिला वकिली करण्यासाठी नागपूरला जायचे होते पण वडील तयार नसल्याने आणि तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसल्याने तिचा हिरमोड होणार होता पण एकेकाळी स्वतंत्र चळवळीत सक्रिय असणाऱ्या तिच्या आजोबांनी देखील वकिली करण्याचे स्वप्न पाहिले होते ते अपुरे स्वप्न नात ओमीताच्या माध्यमातून पूर्ण होण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी आपल्या मुलाची समज काढत नात ओमिताला वकिली करण्याची वाट मोकळी करून दिली .

हेही वाचा - धक्कादायक! कोरोनाबाधित मजूरांकडून म्हाडा कॉलनीचे बांधकाम; बाजारपेठांमध्येही मुक्त वावर 
 
वकिली चे शिक्षण पूर्ण करतांना वडिलांनी तिला नागपुरात राहण्याची परवानगी दिली नसल्याने तिने सलग पाच वर्षे उमरेड ते नागपूर असा १०० किमी चा प्रवास नित्यनेमाने केला आणि वकिली चे स्वप्न पूर्णत्वास नेले , मात्र त्यानंतर वडील नेहमी तिच्या बाजूने उभे राहिले इतकेच नव्हे तर तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य वडिलांनी दिले .

नागपूर च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरात आर्थिक परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे तिने नागपूर च्या एका नामांकित वकीलाकडे नौकरी करण्यास सुरुवात केली तेव्हा तिला २५०० रुपये महिन्याला पगार मिळायचा , काही काळ नौकरी केल्यानंतर तिने यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला जायचे ठरवले , तयारी करत असतानाच तिने कायद्याचे उच्चशिक्षण पूर्ण केले यूपीएससी त तिला अपयश आल्याने ते सोडून दिले नंतर तिला एक कंपनीत ३५ हजारांची नौकरी मिळाली आणि आता ती स्वतः एका कंपनीची भागीदार असून महिन्याला दोन लाख रुपये कामवित असल्याचे तिने सांगितले .

 सध्या ती दिल्ली ह्यूमन राईट्स काउंसलिंग अंडर वुमन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे अध्यक्षपद भूषवत असून , भारत स्वाभिमान ट्रस्ट ची फाउंडर मेंबर तथा विकल्प एक समाधान या एनजीओ ची सक्रिय सभासद , प्रज्ञाता फाउंडेशन एनजीओमध्ये तिचा सक्रिय सहभाग आहे. 

फोरेवर स्टार इंडिया च्या वतीने ओमिताला द रियल सुपर वुमन २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आले आहेत पण त्यांची स्वप्न मोठी आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिगल रूट लाइफ आणि फन विच सायन्स यांच्या सहकार्याने मोफत वेबिनार चे आयोजन ओमीता करते , वुमन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या प्रमुख पदावर ओमित कार्यरत आहे वुमन कॉनक्लेव्ह अँड अवर्ड्स या कार्यक्रमात या वर्षीचा बेस्ट लीगल कॉर्पोरेट पुरस्कार मिळाला आहे.

ओमिता ओमिता डब्ल्यू.आय. सी. सी. आय या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमही घेत असते ,गरजू लोकांसाठी आठवड्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अन्नदान , वस्त्रदान अभियान ,वयक्तिक पातळीवर मानवाधिकाराचे मूलभूत कायदे सामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन,  लहान मुलांचे भेदभाव विरहित संगोपन माहिती आणि महत्त्व या विषयावर मोफत वेबिनार चे आयोजन ,मानसिक आरोग्य ,तृतीयपंथीयांची अधिकार ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांचे अधिकार या विषयांवर जनजागृती चे कार्य ही संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात .

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()