Christmas 2020: चर्चमध्ये केवळ ५० जणांनाच परवानगी; नागपूर महापालिकेनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना 

Only 50 people allowed in church on Christmas in Nagpur church
Only 50 people allowed in church on Christmas in Nagpur church
Updated on

नागपूर ः नाताळ सण साजरा करण्यासाठी महापालिकेने आज सायंकाळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरला मध्यरात्री करण्यात येणारी प्रार्थना सायंकाळी सात वाजेपर्यंत घेण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी खिश्चन बांधवांना केले आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी नव्या कोरोनामुळे महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. नागरिकांचे आरोग्य अबाधित राखून नाताळ सण साजरा करण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी आज नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. नाताळ सण साध्या पद्धतीने घरीच साजरा करण्याचे आवाहन करताना आयुक्तांनी चर्चमध्ये गर्दी करू नये, अशा सूचना केल्या आहेत. 

चर्चमध्ये केवळ ५० लोकांमध्येच सोशल डिस्टन्सिंगसह विशेष प्रार्थना सभा घेता येणार आहे. एवढेच नव्हे चर्चचे निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यासही बंधनकारक करण्यात आले आहे. प्रभू येशू यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी केवळ १० गायकांनाच परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येकाला वेगळा माईक देण्याचेही बंधने घालण्यात आली आहे. 

६० वर्षांवरील नागरिकांना तसेच १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाण्याचे टाळावे, त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थना सभेचे आयोजन करावे, असेही या मार्गदर्शक तत्‍वांमध्ये नमुद आहे. फटाक्यांच्या आतषबाजीला बंदी घालण्यात आली असून ३१ डिसेंबरला मध्यरात्री घेण्यात येणारी प्रार्थना सभा सायंकाळी सात वाजेपर्यंतच घ्यावी, असे असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

खाजगी रुग्णालयांना आदेश

शहरात युरोप, दक्षिण आफ्रिका, मिडल-ईस्ट देशातून आलेले नागरिकांपैकी कुणी कोव्हीड उपचारासाठी आल्यास त्यांची माहिती महापालिकेला द्यावी, असे आदेश आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांना दिले आहे. गेल्या तीन आठवड्यातील रुग्णांची प्रवासाची माहिती घ्यावी, असेही आदेश त्यांनी दिले आहे. या रुग्णांना मेडिकलमधील विशेष वॉर्डात उपचारासाठी पाठवावे, असेही त्यांनी आदेशात नमुद केले आहे.

आयुक्त विमानतळावर

परदेशातून विमानाने येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळावर रुग्णांच्या तपासणीची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगचे पालन, त्यावर नियंत्रण कसे आहे, याबाबत आयुक्तांंनी आढावा घेतला. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()