आई मला खेळायला जायचं, जाऊ दे न वं..! मुलं हट्ट करत असतील तर निवडा 'हे' पर्याय

options for child in lockdown if they more stubborn for outing even in corona time in nagpur
options for child in lockdown if they more stubborn for outing even in corona time in nagpur
Updated on

नागपूर : अंगभूत ऊर्जेचा निचरा हा मैदानावर खेळ खेळण्यातूनच होत असतो. मात्र, वर्षभरापासून घरात अडकून पडल्याने लहान मुलांची कुरबूर सुरू झाली आहे. शाळा नाही, परिक्षाही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे निदान बाहेर खेळायला तरी जाऊ या असा मुलांचा हट्ट अनेक कुटुंबात पाहायला मिळत आहे. बाहेर जाण्यास पालक सक्तीने नन्नाचा पाढा वाचत आहेत. यामुळे दिवसरात्र फक्त टीव्ही बघायची का असा प्रश्न मुले विचारत आहेत. 

कोरोनामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात शाळा कॉलेजेससह मॉल, बाग-बगीचे आदी गर्दीचे परंतु सहज संसर्ग पसरू शकणारे ठिकाणे तात्पुरती बंद आहेत. शाळा बंद, परिक्षाही नाही म्हटल्यावर तर मुलांची चंगळच. अभ्यास नाही की कोणतेच टेन्शन नाही. निवांत टीव्ही पहायचा आणि खेळायचं असं वाटणं सहाजिक आहे. परंतु, तसे काही नाही. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना घराबाहेर पडायलाही मनाई करत आहेत. टीव्ही पाहणे सगळ्यांनाच आवडते. परंतु, वर्षभरापासून तासोनतास टीव्ही पाहून कंटाळा येणे सहाजिक आहे. जाणकार आणि तज्ज्ञांच्या मते कोरोनामुळे जो बदल होत आहे तो स्वीकारून मुलांसाठी नवीन वाटा, नवीन पर्याय शोधणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - Well Treat Hospital Fire : मृतांच्या कुटुंबीयांच्या...
 
कोरोनामुळे शाळांना सुटी जाहीर केली परिक्षाही रद्द केल्या. पालक म्हणून आम्हाला हायसे वाटले. परंतु, आता काय करावे हा प्रश्न पडला आहे. मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे शक्य नाही. मैदानावर पाठविण्याची भीती वाटते. घरात राहून मुले चिडचिड करत आहेत. अभ्यासासोबत त्यांच्या सर्वांगिण विकासाबाबतही काळजी वाटत आहे. 
-प्रतीक्षा चौधरी, फ्रेन्ड्स कॉलनी, नागपूर 

यापूर्वी सुटी म्हटलं की धम्माल मज्जा यायची. आता सुटी म्हणजे कंटाळवाणे झाले आहे. टीव्हीसुद्धा बोर झाला आहे. मित्र-मैत्रिणींचा संपर्क केवळ मोबाईलद्वारे होतोय. ऑनलाइन क्लासद्वारे डान्स शिकत आहे. 
-रिया, वर्ग ८ वी 

शाळा बंदच आहेत. आता मस्त कार्टून पाहणार, घरी मज्जा करणार. परंतु, बाहेर सायकलिंग व स्केटिंग करायला मम्मी-पप्पा पाठवत नाही. 
-अर्जुन, वर्ग ५ वा 

नवीन संकल्पनांशी जुळवून घ्या - 
मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. सद्य परिस्थितीत कोविडची भीती एवढी आहे की कोणीही पालक मुलांबाबत धोका घेऊ शकत नाही. कोविडमुळे जग बदलत आहे. त्या बदलांशी जुळवून घेत मार्गक्रमण करावे लागणार आहे. आता इनडोअर गेम तसेच मोबाईल व संगणकाद्वारे नवीन संकल्पनांचा वापर, उपयोग करून बालकांच्या ऊर्जेचा सुयोग्य वापर करावा लागणार आहे, असे मेडिकल ऑफिसर डॉ. बी. पाल म्हणाले. 

असे आहेत परिणाम -

  • मुलांच्या वाढ, विकासावर प्रतिकूल परिणाम शक्य 
  • घरात आदळआपट, धुसफूस, भांडणे 
  • शारीरिक व मानसिक कणखरतेवर प्रश्नचिन्ह 

काय करता येईल - 

  • संगणक, मोबाईलद्वारे नवीन कौशल्य शिकणे 
  • आपले घरच मुलांसाठी 'होमग्राउंड' करावे 
  • प्रेम, जिव्हाळा वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न 
  • बदलत्या परिस्थितीची जाणीव करून द्यावी 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.