नागपूर : जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. दररोज ३,५०० ते ४,००० च्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. यामुळे प्रशासन चांगलेच चिंतेत आहे. वाढल्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन केले आहे. मात्र, याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड वॉर्डामध्ये दाखल झालेल्या रुग्णाने गळफास लावून आत्महत्या केली. पुरुषोत्तम गजभिये असे मृत वृद्घाचे नाव आहे. ही घटना होळीच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
पुरुषोत्तम गजभिये यांना बर वाटत नसल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, इथे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. दोन दिवसांपासून कुणीही फिरकून न पाहिल्याने तसेच त्रास असह्य होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. कोणतीही उपाययोजना यावर नियंत्रण मिळवण्यात सक्षम ठरलेली नाही. लॉकडाउन केल्यानंतरही रुग्णसंख्येचा आकडा काही कमी झालेला नाही. अशात शासकीय असो किंवा खासगी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार होत नसेल तर याला काय म्हणावे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. उपचार मिळणे तर दूरच कुणीही रुग्णाची साधी विचारपूसही करीत नसल्याचे समोर आले आहे. अशा दुर्लक्षामुळे व असह्य होणाऱ्या त्रासाला कंटाळून गजभिये कोविड वॉडॉच्या तळघरात गेले. येथे त्यांनी ऑक्सिजनच्या पाइपच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.