भूक लागली आहे, जेवण कुठं मिळेल जी? खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांची पायपीट

patients relative facing problems for food due to lockdown in nagpur
patients relative facing problems for food due to lockdown in nagpur
Updated on

नागपूर : जिल्ह्यात कोरोना वाढल्याची चिंता व्यक्त करीत प्रशासनाने लॉकडाउन केला. मात्र मेडिकल, मेयोसह सुपर, डागा आणि इतरही खासगी रुग्णालयाच्या आवारातील रुग्णांच्या नातेवाइकांना मात्र जेवण मिळविण्यासाठी पायपीट करावी लागली. अनेक नातेवाईक रस्त्यावर येऊन खुद्द पोलिसांना जेवण विकत कुठे मिळेल? अशी विचारणा करीत होते. मेयो रुग्णालयातील एका नातेवाईकाने रेल्वेस्थानकावर मिळालेले ब्रेड खाऊन दिवस काढला. काही नातेवाइकांनी उपाशीच दिवस काढावा लागला. 

मेडिकल, मेयो या रुग्णालयात दर दिवसाला अडीच हजार रुग्ण उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येतात. डागा रुग्णालयात दर दिवसाला अडिचशेपेक्षा अधिक महिला तपासणीला येतात. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हजारापेक्षा अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. मात्र सोमवारी लॉकडाउन असल्यामुळे ६० टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात झाली आहे. 

ऑनलाइन जेवण कसे मागवणार? 
कोरोना रुग्णांच्या वॉर्डात नातेवाइकांना जात येत नाही. मात्र, गैर कोरोना रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक रुग्णालयात मदतीला असतात. त्यांच्या चहा नाश्ता व जेवणाची सोय काही स्वंयसेवी संस्था मोफत करतात. मात्र, लॉकडाउनमुळे अनेक संस्था पोहोचू शकल्या नाहीत, तर मेडिकलमध्ये काही संस्थांनी रुग्णाच्या नातेवाइकांना जेवण दिले असल्याची माहिती आहे. ऑनलाइन खाद्यापदार्थच मागवण्यासाठी मुभा देण्यात आली होती. परंतु, नातेवाईकांजवळ मोबाईल नसते. असला तरी साधा मोबाईल असतो. ऑनलाइन सेवा कशी दिली जाते, हे देखील नातेवाइकांना माहीत नसते. त्यात सर्व हॉटेल, भोजनालय बंद असल्याने सोमवारी मेडिकल, मेयोसह डागा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. मेडिकलमध्ये १० रुपयांत जेवण काही रुग्णांना मिळाले. परंतु, मेयोत ही सेवा ठप्प होती. 

नातेवाइकांना महापालिकेने सोडले वाऱ्यावर : इंटकचा आरोप 
गेल्यावर्षी लॉकडाउनच्यावेळी महापालिका प्रशासनाने विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने मेडिकल, मेयो रुग्णालय परिसरात जेवणाचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, यावेळी ही सोय करण्यात आली नाही. महापालिकेने नातेवाइकांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरन सहारे यांनी केला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.