ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

Price of Gold and silver dropped by 5 thousand and 10 thousand respectively
Price of Gold and silver dropped by 5 thousand and 10 thousand respectively
Updated on

नागपूर :  टाळेबंदीमुळे सोन्याचे दर अनपेक्षितपणे चाळीस हजारांहून ५८ हजारपर्यंत पोहोचल्यानंतर गेल्या सव्वीस दिवसापासून दर सतत घसरण होत आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दरात ५ हजार २०० रुपयांची घसरण झालेली आहे. आता श्राद्धपक्ष सुरू असून त्यानंतर अधिक महिना आहे. त्यामुळे दिवाळी आणि लग्न सराईचा मोसम दीड ते दोन महिने पुढे गेला आहे. शेअर बाजारातही सुधारणा होत असल्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे बोलले जात आहे. 

आज प्रति दहा ग्रॅम सोने ५१ हजार ५०० इतका दर आहे. सोने- चांदी दरवाढीचा अंदाज लक्षात घेता खरेदीसाठी ‘अच्छे दिन' असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सोने खरेदी करण्याचे विस्कटलेले बजेट आता आटोक्यात आले आहे.

सोने ८५ हजारावर जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ५७ हजार रुपयावर सोने असताना ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, आता सोने ५२ हजाराच्या आसपास घुटमळत आहे. चांदी प्रति किलो ७४ हजारावर पोहोचली होती. ती आता ६५ हजाराच्या जवळ स्थिरावली आहे. सोन्याला अनेकजण गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. 

हजारो वर्षांपासून भारतीय कुटुंबांमध्ये एक विशेष आणि अलंकारीत मालमत्ता म्हणून सोन्याला विशेष स्थान आहे. ही भावना आजही खरेदीदारांच्या मनामध्ये कायम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोने केवळ लग्नात दागिन्यांपुरते खरेदी न करता भविष्याची सोय म्हणूनही घेतले जात आहे. मागील काही महिन्यांचा विचार करता सध्या सोने खरेदी करण्यास उपयुक्त काळ असल्याचे सराफा व्यापारी राजेश रोकडे म्हणाले.

५ ते ६ टक्के घट अपेक्षित

तज्ज्ञांच्या मते सोने-चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदार नफा मिळविण्यासाठी विक्री वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात ५ ते ६ टक्के घट अपेक्षित आहे. त्यानुसार सोने ४७,५०० ते ४८ हजार रुपयापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने लग्नाची खरेदी करण्याचे मनसुबा आखलेल्या ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी प्राप्त होऊ शकते. सध्या श्राद्ध पक्ष असल्याने सोन्याची मागणी घटण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा अच्छे दिन येतील असेही त्यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()