फटाक्यांच्या आतषबाजीत ‘साहेबां’चा वाढदिवस आणि आला चर्चेला भयंकर उधाण...

file
file
Updated on

कोदामेंढी (जि.नागपूर) : मागील पाच महिन्यापासून कोरोनामुळे सण, उत्सव आणि लग्न समारंभ धूम धडाक्यात करण्यावर बंदी आहे. कित्येक महिन्यांपासून उत्सवाची मिरवणूक अथवा लग्नाची वरात, बँड-डीजे आणि फटाक्याची आतिषबाजी पहायलाच मिळली नाही. मात्र कोरोनाकाळात मौदा तालुक्यात तर अघटीतच घडले. चक्क ठाणेदारांचा वाढदिवस फटाक्याच्या आतिषबाजी करून साजरा झाला. गावात आज काय आहे, काय घडले, अशा भ्रमात गावकरी पडले. नंतर कुणीतरी सांगितले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून हा धुमधडाका सुरू आहे बरं का !

अधिक वाचाः दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर…

सिंघम’दबंगगिरीमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
२३ फेब्रुवारी २०१९ ला अरोली पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारून साहेबांनी जोरदार ‘एन्ट्री’ मारली. ‘सिंघम’ नावाने नावलौक मिळविला. ‘सिंघम’च्या दबंगगिरीमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. यामुळे सर्वसामान्य जनतेला बरे वाटले. तसेही समाजाबाबत आणि सामाजिक कार्यात त्यांचा चांगला सहभाग असतो. या भागात वाळू माफियांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यांच्यावर देखील लगाम लागेल असेही जणू वाटले होते. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर झाले उलट. वाळूमाफियांशी जवळीक झाली आणि पूर्वी ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक चालायची, ती आता ट्रकवर आली. एक दिवस पूर्वीपासून सोशल मीडियावर ‘साहेबां’वर  शुभेच्छाचा वर्षाव सुरु होता, तर काही माफियांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि एक स्वीय प्रतिनिधी आभार धन्यवाद व्यक्त करीत होता. एक विशेष म्हणजे या दिवशी बऱ्याच माफियांची फेसबुक आणि व्हाटस ॲप डीपी तसेच स्टेट्स म्हणजे साहेबांचा वाढदिवस हेच होते. जल्लोषात  साहेबांचा वाढदिवस म्हणजे माफियांचे भले होत असल्यानेच तितके प्रेम सहजच आहे. मोठा केक आणि इतर केक कापून बर्थडे सेलिब्रेट करण्याची मज्जा काही औरच.  मात्र याबाबतचे कसलेही फोटो सोशल मीडियावर वायरल न होण्याची खबरदारी त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळगली, हे मात्र तितकेच विशेष म्हणावे लागेल.  

हेही वाचाः बेरोजगार मित्र सतत द्यायचा त्रास, कंटाळून तिने केली आत्महत्या

नजरेत खुपणारा प्रकार
 कामात कसलाच कसूर ‘साहेब’ सोडत नाहीत. पण आज वाळूमाफियांच्या बाबतीत काही औरच आहे. नेहमी वाळूमाफियांचे वादळ घोंगावतांना लोकांच्या नजरेत खुपणारा हा प्रकार झाला आहे. अरोली पोलिस ठाणे म्हणजे माफियांचा ‘हब की काय, असाही सवाल आहे. मात्र अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर वचक लावण्यात ते आतातरी अपयशी ठरले, हे मात्र त्यांना पचवावे लागेल.  भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील नायब तहसीलदार नवनाथ कातकडे आता मौदा येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. त्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात वाळू माफियांनी नऊ केक कापून साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते आणि तशी बातमी देखील वृत्तपत्रात झळकली.

चोरांशी जवळीक कशाला?
फटाके फुटलेच नाही मी ठाण्यातच होतो. वाळू माफिया नव्हते. चोरांशी कशाला जवळीक साधू. फेसबुकवर इतरांनी देखील शुभेच्छा दिल्या.  
विवेक सोनवणे
ठाणेदार, अरोली

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.