सोसायटीचे नाव ‘जय श्रीराम’ अन् कामं मात्र रावणासारखी; वाचा काय आहे प्रकार

Scam in Jai Shriram Society at Nagpur crime news
Scam in Jai Shriram Society at Nagpur crime news
Updated on

नागपूर : गणेशनगरातील जय श्रीराम अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटीत ७९ कोटींचा घोटाळा झाल्याचे विशेष लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सोसायटीच्या अध्यक्षासह सहा पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. खेमचंद मेहरकुरे (वय ५८, रा. आशीर्वादनगर), अर्चना टेके, योगेश चरडे, अभिषेक मेहरकुरे, अंकुश कावरे, अशोक दुरबुडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

तुळशीबाग रोड, महाल येथील रहिवासी दिनेश पडेगावकर (५५) व अन्य पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोसायटीतील तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापक पदाधिकाऱ्यांनी अधिक व्याजाची हमी देऊन त्यांचेकडून एफडी, आरडी व बचत ठेव स्वरूपात पैशाची गुंतवणूक करून घेतली. परंतु, अनेकांना अधिकचा परतावा सोडाच गुंतवणूक केलेली रक्कमही परत मिळाली नाही.

पदाचा गैरवापर करीत पदाधिकाऱ्यांनी सोसायटीत अफरातफर करीत रक्कम लाटली. सोसायटीच्या विशेष लेखापरीक्षणात ७९ कोटी ५४ लाख २६ हजार ९६३ रुपयांचा अपहार केल्याचे आणि ठेवीदारांच्या सुमारे ६ कोटी ४७ लाख ४७ हजार ६६९ रुपये परत न करता अपहार केल्याचे स्पष्ट झाले.

त्याआधारे कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला होता. आर्थिक गुन्हेशाखा पथकानेही समांतर तपास सुरू ठेवला. यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी अध्यक्ष मेहरकुरेलाही अटक करण्यात आली. 

आर्थिक गुन्हे शाखेचे नागरिकांना आवाहन

जय श्रीराम अर्बन को. ऑप. सोसायटीच्या गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे. या संबधाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासकीय इमारत क्र. १ येथे पोलिस निरीक्षक मिना जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()