अन् शाळेतील गुरूजी चक्क बनले गांजा तस्कर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

School teacher caught by police doing illegal drugs smuggling
School teacher caught by police doing illegal drugs smuggling
Updated on

नागपूर ः लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या शाळेतील दोन मास्तरांनी गांजा तस्करी सुरू केली. हैदराबादमधून दिल्लीला गांजाची तस्करी करताना बलतरोडी पोलिसांनी एका गुरूजीला अटक केली. गुरूजीकडून कार आणि ९१ किलो गांजा सह १८ लाखांचा माल जप्त करण्यात आला. 

अटकेतील आरोपी शिवशंकर यल्लया इसमपल्ली (२७) आहे. शिवशंकर मूळचा वारंगल-आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहे. हैद्राबादच्या कुकटपल्ली येथील एका शाळेत तो शिक्षक आहे. बेलतरोडी पोलिसांना माहिती मिळाली होती की, कार (क्र. डीएल-४सीएडी-३६६५) मधून गांजाची तस्करी होत आहे. ती कार वर्धा मार्गाने दिल्लीला जाणार आहे. पोलिसांनी वर्धा मार्गावर सापळा रचला. 

रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलिसांनी कार थांबवून कारची झडती घेतली. ४ प्लॅस्टिकच्या पोत्यांमध्ये ९१ किलो ५५६ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी कार चालक शिवशंकरला ताब्यात घेतले. कार, मोबाईल, गांजा आणि रोख असा एकूण १८.८४ लाख रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे, आणि पीआय विजय अकोत यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विकास मनपिया, तेजराम देवळे, गोपाल देशमुख, मिलिंद पटले, प्रवीण जांभुळकर, कुणाल लांडगे आणि नितीन बावणे यांनी केली. 

गुरूजी म्हणाले... 

शिवशंकर गुरूजी म्हणाले की हैद्राबादच्या एका शाळेत मी शिक्षक आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले होते. या दरम्यान शाळेतीलच एका शिक्षकाने गांजा तस्करीची आयडीया दिली. तसेच एक कार दिल्लीला पोहोचविण्यास सांगितले आणि यासाठी १० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखविले. त्याच्याकडे बेरोजगार असल्याने तो यासाठी तयार झाला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.