परिस्थिती अधिकच चिंताजनक : सप्टेंबरनंतर एकाच दिवशी ४० रुग्ण दगावल्याची दुसरी वेळ

This is the second time since September that 40 patients have been died on the same day
This is the second time since September that 40 patients have been died on the same day
Updated on

नागपूर : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचे तांडव सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दर दिवशी तीन हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. सोमवारी (ता. २२) तीन हजार ५९६ बाधितांची नव्याने भर पडली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा आकडा २ लाखांजवळ पोहोचला आहे. कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत ४० रुग्ण दगावले आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. २७ सप्टेंबर २०२० रोजी ४३ कोरोनाबाधित दगावले होते. त्यानंतर ४० जणांचा एकाच दिवशी मृत्यू होण्याची ही दुसरी वेळ आहे. या ४० मृत्यूंमध्ये शहरातील २१ तर ग्रामीण भागातील १५ आणि जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ६६४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आतापर्यंत १ लाख ९६ हजार ६७६ कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. सोमवारी मेडिकलमध्ये तब्बल ४२३ रुग्ण  मेयोत  ४२५ तर एम्स ७० रुग्ण दाखल आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह येथे १५१ गंभीर संवर्गातील कोरोनाबाधित दाखल आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने १५ हजारावर चाचणी होत असताना सोमवारी मात्र १२ हजार ६२३ संशयित व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ हजारांवर

नागपूर शहरात २४ हजार १७३ तर  ग्रामीण भागात  ६ हजार ८९४ असे एकूण ३१ हजार ६७ सक्रिय कोरोनाबाधित नागपूर जिल्ह्यात आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ३ हजार ७९९ कोरोनाबाधितांवर मेयो, मेडिकलसह विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर  २३ हजार ६७२ कोरोनाचे रुग्ण गृहविलगिकरणात आहेत.

१ लाख ६० हजार कोरोनामुक्त

शहरात दिवसभरात १ हजार ५६४ तर ग्रामीण २७३ असे एकूण १ हजार ८३७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ३० हजार ३०, ग्रामीण भागातील ३० हजार ९१५ अशी एकूण १ लाख ६० हजार ९४५ व्यक्तींवर पोहोचली आहे.  कोरोनामुक्तांचे प्रमाण ८१.८३ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()