उपराजधानीवर घोंघावतेय दुहेरी संकट; कोरोनासह या आजाराचे आढळले 75 रुग्ण

seventy five sari patient found in Nagpur
seventy five sari patient found in Nagpur
Updated on

नागपूर : कोरोनाशी लढताना प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत आहेत. शहरात दोन हजार 938 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील 138 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. उर्वरित दोन हजार 800 चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, या कोरोनासोबतच एकट्या मेडिकलमध्ये मागील दहा दिवसात "सारी' आजाराच्या 75 रुग्णांची नोंद झाली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) 16 एप्रिलला 52 वर्षीय पुरुषाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला मधुमेह, रक्ताचा कर्करोग व श्‍वसनाचा त्रास होता. विशेष असे की, न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान बाराच्या सुमारास तो दगावला. अनेक व्याधीसह "सारी' असल्याचे स्पष्ट झाले. सारीच्या आजाराने हा रुग्ण दगावल्यानंतर मात्र मेडिकलमध्ये सारीच्या रुग्णांची नियमित नोंद घेण्यात येत आहे. 

महिनाभरात साडेतीनशेपेक्षा अधिक सारीचे रुग्ण विदर्भात आढळून आले आहेत. सारी (सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) या आजाराचे रुग्णांची मेडिकलमध्ये होणारी नोंद चिंताजनक आहे. त्यात कोरोनासह सारीच्या नोंदीचे दुहेरी संकट शहरावर घोंघावत आहे. संचारबंदीचा काळ बघता मेडिकलमधील रुग्ण हे नागपुरातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

अशी आहेत लक्षणे

सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी व ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते, शिवाय खूप अशक्तपणा येतो. न्यूमोनिया, श्‍वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी लक्षणेही आहेत. रुग्णालयात बऱ्याच रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडते. 

दिवसनिहाय आढळलेले रुग्ण

  • 21 एप्रिल ः 4 
  • 22 एप्रिल ः 7 
  • 23 एप्रिल ः 4 
  • 24 एप्रिल ः 12 
  • 25 एप्रिल ः 5 
  • 26 एप्रिल ः 6 
  • 27 एप्रिल ः 8 
  • 28 एप्रिल ः 4 
  • 29 एप्रिल ः 9 
  • 30 एप्रिल ः 16 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.