‘डिलिवरी बॉय’, ऑटोचालकांसाठी विशेष लसीकरण; महिलांनाही मिळणार लाभ

Special vaccination drive at 63 Corporation centers from tomorrow
Special vaccination drive at 63 Corporation centers from tomorrow
Updated on

नागपूर : शहरात नागरिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारे ऑटोचालक तसेच विविध खाद्यपदार्थ व वस्तू लोकांच्या घरी पोहोचविणाऱ्या डिलिवरी बॉयसाठी ८ एप्रिलपासून महापालिकेच्या सुरू असलेल्या ६३ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय महिलांसाठीही विशेष मोहीम असून, त्यांनाही लस घेण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा ४५ वर्षांवरील सर्व महिला, ऑटोचालक, डिलिवरी बॉयसाठी आहे.

शहरात लसीकरण अभियान जोमात सुरू आहे. परंतु अद्यापही ऑटोचालक, डिलिवरी बॉय लसीकरणापासून वंचित आहे. ते सदैव बाहेर फिरत असल्याने सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने आता त्यांच्यासह महिलांसाठी ८ ते २४ एप्रिलदरम्यान विशेष लसीकरण मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ८ एप्रिलपासून ही मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

८ एप्रिलला सर्व वाहन चालकांचे लसीकरण केले जाईल. यात ४५ वर्षांवरील ऑटो रिक्षा चालक, सायकल रिक्षा चालक, ई-रिक्शा चालक, टॅक्सी चालक, ओला-उबेरचे चालक व अन्य खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात लस दिली जाईल.

वाहनचालकांना कुटुंबातील पात्र व्यक्तींनाही लसीकरणासाठी घेऊन जात येणार आहे. या सर्व नागरिकांनी आधारकार्ड किंवा पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेंससोबत बाळगणे आवश्यक आहे. ८ ते २४ एप्रिलदरम्यान महिलांनाही शासकीय लसीकरण केंद्रांवर लस घेता येणार आहे. 

विविध वर्गासाठी लसीकरणाचा दिवस 

  • ८ एप्रिल - ऑटो, सायकल रिक्षा, टॅक्सी, ट्रॅव्हल्स बसचे चालक 
  • १२ एप्रिल - डिलिवरी बॉय 
  • १४ एप्रिल - भाजी, फळ, दूध विक्रेते 
  • १६ एप्रिल - कामगार, हॉकर्स 
  • २० एप्रिल - व्यापारी, मेडिकल दुकानदार 
  • २२ एप्रिल - रेस्टॉरंट, हॉटेल कर्मचारी 
  • २४ एप्रिल - सेल्स व मार्केटिंग करणारे प्रतिनिधी

पत्रकारांना १८ एप्रिलला संधी

प्रसारमाध्यमात काम करणारे पत्रकार तसेच कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर १८ एप्रिलला लसीकरण करता येणार आहे. एवढेच त्यांना त्यांच्या कुटुंबातील ४५ वर्षांवरील इतर सदस्यांनाही लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन जाता येणार आहे. 

बुधवार महिला स्पेशल

समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनाही लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाद्वारे प्रत्येक बुधवारी महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी नमुद केले. याशिवाय ८ ते २४ एप्रिलदरम्यान मोहिमेअंतर्गतही त्यांना लसीकरण करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.