'घरी रहा, सुरक्षित रहा' या मानसिकतेतून बाहेर पडा..राज्यात मोठया पदावर असणाऱ्या व्यक्तीचे विधान.. वाचा सविस्तर...
नागपूर: कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. त्यात सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला सतत दिला जात आहे. 'घरी रहा, सुरक्षित रहा' असा संदेश सर्वत्र सोशल मीडियावरून पसरत आहे. घरी राहूनच आपण कोरोनाला हरवू शकतो असा समज अनेकांचा आहे. मात्र या मानसिकतेतून आपण बाहेर पडायला हवे असे विधान राज्यात सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण या दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
खबरदारी घ्या आणि आनंदी रहा
देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर घरी रहा, सुरक्षित रहा या मानसिकतेतून बाहेर पडून खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यानी आपले विचार मांडले. कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, कुलसचिव डॉ. नीरज खटी, डॉ. चंद्रशेखर देठे, विद्यार्थी कल्याण संचालक अभय मुदगल, डॉ. सुबोध बन्सोड उपस्थित होते.
नैराश्य ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांचे उदाहरण
लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. सोक्रेटस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संत साहित्याच्या वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.