गोष्ट बुटक्यांच्या डोंगराएवढ्या लग्नाची; नवरीची पाठवणी करताना रडलं अख्खं गाव

The story of Jaish and Ankitas wedding is like a mountain
The story of Jaish and Ankitas wedding is like a mountain
Updated on

नागपूर : वराचं नाव जैश रामटेके... राहणार नागपूर जिल्ह्यातील कन्हान... वधूचे नाव अंकिता धोडके... राहणार भंडारा जिल्ह्यातील चिचाळ... या देघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला... सर्वसामान्यांच जसं लग्न होते तसं लग्न यांचे झाले. अंकिताला सार करताना चिचाळवासी हुंदके देत रडले. दुसऱ्या दिवशी वर कुटुंबीयांकडून स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कन्हानवासीयांनी ‘डीजे’च्या तालावर डान्स केला. हा लग्न सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा होता. कारणही तसे विशेषच... दोघेही बुटके... अर्थात लहानगे नवदाम्पत्य...

जैश रामटेके फक्त साडेतीन फूट उंचीचा. शाळेत शिकत असतानाच आपली उंची सामान्य नसल्याचे जैशच्या लक्षात आले. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेता आले नाही. यामुळेच शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले. शिक्षण कमी असल्याने जैशला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यातही उंची कमी असल्याने अधिक त्रास झाला. 

घरची परिस्थिती हलाखीची आणि शिक्षणही सुटले मग करायचे काय, अशा प्रश्न मनात उपस्थित झाला. यामुळे जैशने काम करण्याचे ठरवले. मात्र, कमी उंचीमुळे कामच मिळत नव्हते. प्रत्येक ठिकाणांवरून नकारच मिळत होता. जिद्द आणि आत्मविश्वासाने भरलेला जैश काही पराभव मानायला तयार नव्हता. अथक प्रयत्नानंतर त्याला कन्हान येथील एका दुकानात नोकरी मिळाली. पगार नाममात्र असता तरी तो समाधानी हेता. हे शक्य झाले उंचीविषयी कधीही कमीपणा येऊ न दिल्याने.

घरच्यांना लागली लग्नाची चिंता

जैश कामाला लागल्यानंतर कुटुंबीयांना लग्नाची चिंता स्वस्त बसू देत नव्हती. मात्र, जैशला आपले लग्न होईल असे वाटत नव्हते. उंची कमी असल्यामुळे आपल्याला कोण मुलगी देईल, असा प्रश्न त्याच्या मनात सतत येत होता. अशात नातेवाइकांकडून एका मुलीचा पत्ता आला. मुलगी भंडारा जिल्ह्यातील चिचाळ येथे राहत असल्याची माहिती जैशच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मुलगीही सारख्याच उंचीची. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला आणि पहिल्याच भेटीत जैश तिच्या प्रेमात पडला.

भातुकलीच्या खेळातील राजा-राणी

सामान्य लग्नाप्रमाणे दोघांत लग्न पार झाले. भातुकलीच्या खेळामधील राजा-राणीप्रमाणे दोघांची जोडी दिसत होती. उभ्या जीवनात विवाहाचा योग जुळून येईल असे दोघांच्याही घरच्यांना वाटले नव्हते. यामुळे नातेवाइकांचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता. लग्नाचा आनंद इतका होता की, अंकिताला चिचाळवासीयांनी हुंदके देत सार केले. जैश आणि अंकिता यांच्या स्वागत समारंभात कन्हानवासीयांनी डीजेच्या तालावर डांस केला. त्यांच्या लग्नाची गोष्ट डोंगराएवढी असल्याने विवाह सोहळा अनेकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

कष्टाला फळ मिळते

लग्न हे परमेश्वर ठरवत असते. लग्न होईल असे आम्हाला वाटत नव्हते. मात्र, ते झाले. तरुणांनी हताश होऊ नये. कशाची कमी न बाळगता काम करीत रहावे. जीवनात कष्टाला फळ मिळते, असे नवदाम्पत्य म्हणाले.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()