सहलीवरून परतताना घनदाट जंगलात बंद पडली विद्यार्थ्यांची एसटी, वाचा ही थरारक कहाणी

chikhaldara incident
chikhaldara incident
Updated on

नरखेड (जि. नागपूर) : तालुक्‍यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येताना चिखलदऱ्याच्या घाटात त्यांची बस अचानक बंद पडली. जंगली श्‍वापदांचे वास्तव्य असलेल्या जंगलात बस थांबल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकही घाबरले. जवळपास कुठूनही मदत मिळण्याची शक्‍यता नव्हती.

अशात शिक्षकांनी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे युवानेते व काटोल तालुक्‍यातील मेटपांजरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना फोन केला. सलील यांनी तत्परतेने हालचाल करीत विदयार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली. शेवटी सर्व विद्यार्थी रात्री दोन वाजता सुखरुप बेलोना येथे पोहोचले. सलील देशमुखांनी तत्परतेने केलेल्या मदतीबद्दल शिक्षक व विदयार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. 

बेलोना येथील मातोश्री सुमनबाई आश्रमशाळेचे विदयार्थी व शिक्षक सोमवारी सकाळी चिखलदरा येथे सहलीकरीता निघाले. यासाठी त्यांनी काटोल येथील आगारातून बस आरक्षित केली होती. दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्वजण परतीच्या प्रवासासाठी निघाले. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथून काही अंतरावर येताच बस बंद पडली. रात्रीची वेळ, घाटाचा रस्ता आणि घनदाट जंगलात बस थांबल्याने सारेच भयभीत झाले.


सलील देशमुखांची तत्परता 
मदत मागण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला, परंतु कोणतीही मदत मिळत नव्हती. अखेर शिक्षकांनी राष्ट्रवादीचे युवानेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्यासोबत संपर्क केला. सलील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्रीहरी बालाजी तसेच चिखलदऱ्याचे पोलिस निरीक्षक शिंदे व परतवाड्याचे निरीक्षक मानेकर यांच्याशी संपर्क केला. चिखलदराचे ठाणेदार शिंदे यांनी तातडीने चिखलदरा घाटात अडकलेली बस गाठली. ज्या ठिकाणी ही बस बंद पडली होती, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे  वास्तव्य आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलिस वाहनांने सर्व विदयार्थी व शिक्षकांना परतवाड्याकडे रवाना केले. तोपर्यंत सलील देशमुख यांनी काटोल आगार प्रमुख रंगारी व परतवाड्याचे आगार प्रमुख बालदे यांना सांगुन दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यास सांगितले. परतवाडा येथे पोहोचल्यावर सलील यांनी सर्व विदयार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व विदयार्थी सुखरूप बेलोना येथे परतले.

आम्ही मोठया संकटात सापडलो होतो. सलील देशमुख यांनी केलेल्या मदतीमुळेच आमचे विदयार्थी व सुखरुप पोहोचू शकलो. कोणतीही मदत मिळत नसताना सलील देशमुख यांनी जी तत्पतरा दाखवली, त्यासाठी आभार. आम्ही त्यांचे जनतेविषयीची आत्मीयता ऐकुन होतो. परंतु त्यांचा कामाचा अनुभव आम्हाला आला. 
- नंदकिशोर बासेवार 
मुख्याध्यापक, मातोश्री सुमनबाई आश्रमशाळा, बेलोना 

मुलांच्या सहलीसाठी आम्ही नवीनच बस दिली होती. परंतु त्यात बिघाड झाला. सलील देशमुख यांनी संपर्क करताच परतवाडा येथून पर्यायी बस देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
- श्री रंगारी, आगारप्रमुख, काटोल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.