आई-वडील कामावर तर बहीण मैत्रिणीकडे गेल्याने पूजा घरात एकटीच होती, मग...

Suicide by young woman in Nagpur
Suicide by young woman in Nagpur
Updated on

नागपूर : ती १९ वर्षांची... पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होती... तिची सलमान (बदललेले नाव) सोबत मैत्री झाली... दोघांचे मोबाईलवरून बोलने सुरू झाले... मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले... दोघांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. याची कुणकूण घरच्यांना लागली अन् विरोध झाला. दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला मग घडला हा प्रकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा उर्फ नगमा (१९, रा. महादुला) ही पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होती. पूजाचे आई-वडील हातमजुरी करतात. तिला मोठी बहीण आहे. ती पदवीच्या प्रथम वर्षाला शिकते. तिची ओळख सलमानसोबत झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा वस्तीत व्हायला लागली. याची माहिती पूजाच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली.

आईने पूजाला दोन झापड मारल्या आणि घरातून बाहेर निघायला बंदी घातली. त्यामुळे काही दिवस दोघांच्या भेटी होऊ शकल्या नाही. आई-वडील कामावर गेल्यावर मोठ्या बहिणीला हुलकावणी देऊन पूजा सलमानला भेटायला जात होती. दोघांचे प्रेम पुन्हा बहरले. दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सलमानने केला समजूत घालण्याचा प्रयत्न

पूजा व सलमान यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती आई-वडिलांपर्यंत पोहेचली. पूजाने कुटुंबीयांसमोर सलमानशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, त्यांनी थेट नकार दिला. आता लग्न होणार नसल्याने निराश झालेल्या पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिची सलमानने समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

... अन् घेतला गळफास

आई-वडील कामावर तर बहीण मैत्रिणीकडे गेल्याने घरात पूजा एकटीच होती. तिने घराच्या आड्याला ओढनी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता बहीण घरी आली. तिने दार उघडताच पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

लिहिली सुसाईड नोट

पूजाने आपली व्यथा मैत्रिणीला सांगितली होती. ‘मै सलमान की नहीं तो किसीकी नहीं’ अशी भूमिका तिने घेतली होती. ‘मम्मी-पप्पा सॉरी, दीदी आप भी मुझे माफ कर दो...’ अशी सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.