नागपूर : वेदांता समूह आणि तायवान येथील 'एयू ऑप्ट्रानिक्स कॉर्पोरेशन' बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत 'एलसीडी पॅनल युनिट' सुरू करणार होते. केंद्र सरकारने अचानकच इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाच्या धोरणात बदल केल्याने हा प्रकल्प गुंडाळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यानिमित्ताने विदर्भात इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. त्याला ब्रेक लागला आहे.
'एयू ऑप्ट्रानिक्स कॉर्पोरेशन' चे सहसंचालक पावेन ली आणि वेदांता समूहाचे अमोघ अग्रवाल, प्रकल्प व्यवस्थापक पंकज प्रियदर्शनी यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांची पाहणी तीन वर्षांपूर्वी केली होती. 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांनी जुन्या बुटीबोरी औद्योगिक परिसरासह राष्ट्रीय महामार्ग-७ येथील चंद्रपूर मार्गावरील बुटीबोरी-२ विस्तारीकरणाची जागा दाखविली होती. 'एमआयडीसी' परिसराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नंद सिंचन जलाशयाची पाहणी केली आणि तेथील पाण्याचे नमुने घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून गुंतवणुकदारांनी बुटीबोरी येथील जागेला भेट दिली. हे युनिट २०० एकर जागेवर उभारण्यात येणार होते. दोन वीज प्रकल्पासाठी आणि प्रक्रियायुक्त पाण्याची आवश्यकता असल्याने प्रदूषण मंडळाने तेथील एका गावामध्ये पर्यावरण सुनावणी घेतली होती. सुनावणी झाल्यानंतर तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. तसेच परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयालाही भेट दिली होती. कोरिया येथील एलजी कंपनीचे अधिकाऱ्यांनीही या परिसराला भेट देऊन जागेची पाहणी केली होती. कोरिया येथून पहिल्या टप्प्यात १०० कामगार व अधिकारी येणार असल्याने त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठीही जागेचीही पाहणी केली होती. जामठा येथील एका मोठ्या फ्लॅट स्कीमची पाहणी केली होती. प्रकल्पापासून निवासी संकुल दूर असल्याने त्याबद्दल सकारात्मकता दाखविली नाही. परंतु, बुटीबोरीजवळील एका हॉटेलमध्ये कामगार आणि अधिकाऱ्यांची राहण्याची व कार्यालयही उभारण्याची तयारी दाखविले होती. हा प्रकल्प येणार म्हणूनच निटो-जपान या एलएडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या फिल्मची कंपनीही येण्यास इच्छुक होती. त्या कंपनीचे संचालकही बुटीबोरीला भेट देऊन गेले होते. मात्र, वेदांत आणि एयू ऑप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनला नागपुरात उद्योग उभारल्यास काही सूट देण्यात येईल, असे आश्वासन केंद्र सरकारने त्यावेळी दिले होते. त्या धोरणात सरकारने बदल केल्याने प्रकल्प बारगळल्याची माहिती पुढे आली आहे. समूहाच्या अधिकाऱ्यांनी आरआयएल-एडीएजी समूहाच्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पालाही भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी जे. बी. संगीतराव उपस्थित होते.
विदर्भाचे मोठे नुकसान -
वेदांता समूह आणि तायवान येथील एयू ऑप्ट्रानिक्स कॉर्पोरेशन बुटीबोरी येथे १६ हजार कोटी गुंतवणूक करून एलसीडी पॅनल युनिट सुरू करणार होते. मात्र, दरम्यानच्या काळात प्रकल्पाबद्दलच्या हालचाली मंदावल्या. विदर्भात येणारी मोठी गुंतवणूकही थांबल्याने या परिसराचे नुकसान झाले आहे.
-नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बीएमए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.