काटोल (जि.नागपूर): अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी स्व.वसंतराव प्रतिष्ठानतर्फे सुरू केलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याच्या परंपरेला कारोना संकटामुळे सलग दीड तपानंतर म्हणजेच 18 वर्षात प्रथमतः खंड पडला आहे.
आतापर्यंत 1 हजार 454 विवाह
सर्वप्रथम सोहळ्याला 2003 मध्ये वसंतराव देशमुख प्रतिष्ठानने सामाजिक कार्याचा वसा धरून प्रारंभ केला. अक्षय तृतीयेच्या दिवसीच मुहूर्तमेढ 2003मध्ये रोवली. दरवर्षी सुमारे दहा हजारांवर जण समुदायाच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र सती अनसूया माता संस्थान परिसरात हा सोहळा धडाक्यात साजरा व्हायचा. यावर्षी कोरोनामुळे विवाहसोहळा स्थगित केला असला तरी अनेकांचे फोन आयोजन समितीला येत आहेत. अत्यंत नियोजनबद्ध यशस्वी आयोजन मूळ कारण ठरले आहे. सोहळ्यात नागपूर वर्धा, अमरावती चंद्रपूर, भंडारा, छिंदवाडा, बैतुल (म. प्र) आदी जिल्ह्यांतून शेकडो नववर-वधूंचे शुभमंगल पार पडतात. त्यामुळे हा दिवस शेकडो वर-वधूंसह लाखो वऱ्हाडींसाठी अवस्मरनीय ठरला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करतात.
गृहमंत्री देशमुखांनी लावले स्वतःच्या मुलामुलीचे लग्न...
वडील स्व. वसंतराव देशमुख यांचा सामाजिक कार्याचा वसा घेत प्रतिष्ठानने 2003 पासून 1,454 सर्वधर्मीय सामूहिक विवाह यशस्वी पार पाडले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह येथे पार पडल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. आयोजक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःच्या मुलीचा 2004 व पुत्र सलील देशमुख यांचा सोहळ्यात विवाह लावून नवा आदर्श दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांनी या सोहळ्याला पसंती दिली आहे. प्रतिष्ठान तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून नियोजन करीत असते. यावर्षी कोविड -19 महामारीचे जागतिक संकट आल्याने सोहळ्याला दीड तापानंतर खंड पडला असला तरी पुढे ही परंपरा कायम ठेवेल, असे प्रतिष्ठानच्या सूत्रांनी सांगितले.
परमेश्वर जगावर आलेले संकट दूर करेल
संकटे येतात काही शिकवून जातात. महामारीचे संकटातून आपण सुरळीत बाहेर पडू, सामाजिक कार्याचा वसा असलेला विवाहसोहळा पुढे आनंदातसुद्धा साजरा करू. आपण कोरोना संक्रमनापासून बचाव करण्यास शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे. परमेश्वर जगावर आलेले संकट दूर करेल.-अनिल देशमुख
गृहमंत्रीकुठलेही अनुदान घेत नाही
कुठलेही शासकीय अनुदान न घेता भव्य आयोजन प्रतिष्ठान यशस्वी पार पाडत आहे. या कार्यात प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा नामदार अनिल देशमुख यांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे.
-प्रा. धनराज राऊत
सचिव, वसंतराव देशमुख प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.