नागपुरात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू... हा परिसर ठरला चौथा हॉटस्पॉट

two corona patients died in a day at nagpur
two corona patients died in a day at nagpur
Updated on

नागपूर : आठवडाभरापुर्वी सेंटर एव्हेन्यूवरील गांधी चौकात बेशुद्धावस्थेत असलेल्या भिक्षेकऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे मेयोतील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. शनिवारी (ता. 30) पहाटे पाच वाजता या भिक्षेकऱ्याचा मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याशिवाय एका खासगी रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलवण्यात आलेल्या 73 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासगीतील रुग्णाला शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल केले. 24 तास उलटण्यापूर्वीच हा कोरोनाबाधित दगावला. यामुळे नागपूर जिल्ह्यात कोरोनाने दगावणाऱ्यांची संख्या 11 झाली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 514 वर पोहचला आहे.

शहरात 23 मे रोजी अवघ्या तिघांना कोरोनाची बाधा झाला होती, त्यात या भिक्षेकऱ्याचा समावेश होता. पन्नाशीतील भिक्षेकऱ्याला एका खाकी वर्दीतील पोलिसाने मेयोमध्ये उपचारासाठी आणले होते. दरम्यान त्याला श्‍वसनाचा आजार असल्याचे आढळून आले. याशिवाय त्याचे पोट फुगले होते, यावेळी उपस्थित डॉ. रणवीर यादव यांनी समयसूचकता दाखवित कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना केली. यात तो भिक्षेकरी बाधित असल्याचे आढळून आले होते. त्याचा यकृताचाही त्रास वाढला होता. यामुळे दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटे पाच वाजता या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगरातील 73 वर्षीय वृद्धाला खासगीत दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यानतंर चाचणीतून बाधित असल्याचे उघड झाले. यामुळे त्याला मेडिकलमध्ये हलवले. एम्समधील प्रयोगशाळेतून राज्य सुरक्षा बलाचा जवान असलेल्या एकाला बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रयोगशाळेतून पाच जण बाधित आढळले आहे. यात नरखेड येथील दोघांना तर पाचपावली येथील विलगीकरणात केंद्रात असलेल्या सतरंजीपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय तांडापेठ या नवीन वस्तीमध्ये एकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. नीरीत तपासलेल्या नमुन्यांमध्ये आणखी सहा जणांच्या घशातील स्त्रावात कोरोने विषाणू आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 514 वर पोचली. भानखेडा आणि पाचपावली विलगीकरण कक्षात दाखल करून घेण्यात आले होते. आता यांना उपचारासाठी मेयो-मेडिकलमध्ये हलवण्यात आले.

शहरातील कोरोना हॉटस्पॉट

नागपुरात पहिला कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट ठरला होता सतरंजीपुरा. येथे 119 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र या हॉटस्पॉटला मागे टाकत मोमीनपुरा कोरोना बाधितांमध्ये नंबर वन झाला आहे. मोमीनपुरा येथे सुमारे 202 कोरोनाबाधित आढळले. तिसरा हॉटस्पॉट गड्डिगोदाम ठरला असून येथे 30 बाधितांची नोंद झाली आहे. शहरात नाईक तलाव हा चौथा हॉटस्पॉट तयार होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()