दुर्दैव! पतीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पत्नीवर रुग्णालयात सुरू होता उपचार

Two wheeler driver killed in tipper collision in Nagpur district
Two wheeler driver killed in tipper collision in Nagpur district
Updated on

वाडी (जि. नागपूर) : वाडी ते खडगाव मार्गावरील भरधाव अवजड वाहने व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षिततेमुळे पुन्हा एका नागरिकाला प्राण गमवावे लागले. सोमवारी (ता. २) लाव्हा येथे टिप्परने दुचाकीवरील पती-पत्नीला धडक देऊन गंभीर जखमी केले होते. या जखमी पती-पत्नीपैकी पतीचा उपचारादरम्यान निधन झाल्याच्या बातमीने गावातील नागरिकांत शोक व आक्रोश निर्माण झाला.

सोमवारी दुपारी सूर्यभान राघोजी ढोक (वय ५४) व त्यांची पत्नी लिलाबाई ढोक (वय ४८) हे दुचाकीने बोढाला मार्गावरील शेतात जात होते. गावातील खडगाव मार्गावरील चौकात वाडीच्या दिशेला जाणाऱ्या भरधाव मुरूम भरलेल्या टिप्परने रस्ता ओलांडत असलेल्या ढोक यांच्या गाडील जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना गावातील नागरिक व नातेवाइकांनी तातडीने वाडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमी पती सूर्यभान ढोक यांची स्थिती गंभीर होती. दोन दिवस रुग्णालयाच्या अथक प्रयत्नांतरही त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ही वार्ता गावात समजताच शोककळा पसरली. ट्रकचालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व दुर्लक्षित कारभाराविरोधात आक्रोश निर्माण झाला. दरम्यान ट्रकचालक पळून गेला.

गावाजवळून जाणाऱ्या या मार्गावर कुठेही गतिरोधक नसल्याने येथून वाडी-खडगाव दिशेला जाणारी वाहने भरधाव जातात. या भागात अनेक खाणी असल्याने गिट्टी व मुरूम भरलेले ट्रक, टिप्पर दिवस व रात्रीही वेगाने जाणे येणे करतात. ही बाब अधिकाऱ्यांना माहित असूनही रस्ता बनल्यानंतर कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने सूचनाफलक, गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे या अपघाताला अप्रत्यक्षरित्या हे अधिकारीही दोषी असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.

बांधकाम अधिकारी यांनी त्वरित पाहणी करून सूचनाफलक, गतिरोधक लावावे व वाडी पोलिसानी या ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी. या मार्गावर धावणारे टिप्पर, ट्रक यांच्या कागदपत्रांची पाहणी करावी अशी मागणी सरपंच जोत्सना नितनवरे, जि. प. सदस्य ममता धोपटे, उपसरपंच महेश चोखांद्रे, रॉबिन शेलारे, प्रकाश डवरे, मंगेश चोखांद्रे, पांडुरंग बोरकर, पुरुषोत्तम गोरे, मोरेश्वर वरठी, बबन वानखेडे, अशोक वानखेडे, गणेश पंडित व नागरिकांनी केली आहे.

ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करा

बुधवारी शोकाकुल वातावरणात मृत सूर्यभान ढोक यांच्यावर लाव्हा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जखमी पत्नी लिलाबाई ढोक या लकडगंज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पतीच्या मृत्यूच्यावेळी त्या दुर्दैवाने इस्पितळातच होत्या. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.