तरुणांनो, जीव इतका स्वस्त झालाय का? मृत्यूच्या दोन घटनांनी हादरली उपराजधानी 

two young boys are no more in different incidents in nagpur
two young boys are no more in different incidents in nagpur
Updated on

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. कुठे तरुण आत्महत्या करत आहेत तर कुठे अपघातात आपले प्राण गमवत आहेत. त्यामुळे तरुणांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का हाच सवाल उपस्थित होतोय. अशाच दोन घटनांमुळे अख्खे नागपूर शहर हादरले आहे.  

विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रज्वल प्रमोद सलोटे (वय १७, अन्नपूर्णानगर, शिवशक्ती लेआउट) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलने शनिवारी १० वाजता जेवण केले आणि रूममध्ये झोपायला गेला. मध्यरात्रीच्या सुमारास प्रज्वलने छताच्या कडीला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना  पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मेयोतून पळाला अन् जीव गमावला

पिंपळाच्या झाडावर चढून पाने तोडत असताना ईलेक्ट्रीक वायरचा स्पर्श झाल्याने करंट लागलेल्या युवकावर मेयोत उपचार सुरू होते. दरम्यान तो पळून गेला. त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. सूरज गणेश गायकवाड (३४, गंजीपेठ, भालदारपुरा) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.

सूरज हा शनिवारी पहाटे सहा वाजता पुजेसाठी पिंपळाची पाने तोडण्यासाठी गेला होता. झाडावर असलेल्या वायरचा त्यांना करंट लागला. ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी मेयोत नेण्यात आले. उपचार सुरू असताना सूरजने पळ काढला. तो अग्रवाल ट्रेडिंग कंपनीजवळ आला आणि लपून बसला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.