दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात "केतेश्‍वरी'चे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

केतेश्वरी
केतेश्वरी
Updated on


रामटेक (जि.नागपूर) : "ती' एक स्वच्छंद निर्झराप्रमाणे आनंद घेणारी, आनंद देणारी ! प्रत्येकाच्या मनात खोल खोल रूजणारी. निर्व्याज, तेव्हढीच धाडसी. समस्या आली की, बिनधास्तपणे मांडणारी. मात्र अचानक हा खळखळता निर्झर निमाला. कोणालाही काहीही कल्पना न "तिचे' जाणे मनाला हूरहूर लावणारे. केतेश्वरी सुधाकर मदनकर नावाचा हा आनंद देणारा निर्झर स्तब्ध झाला तो कायमचा. का तिचे जाणे मनाला हुरहूर लावते...

आणखी वाचा : अन्‌ पोलिसांनी कानठळया बसविणा-या सायलेंससरचा काढला आवाज

ती झोपली कायमचीच !
रामटेक जवळील नंदापुरी हे छोटेसे टुमदार गाव. मौदा तालुक्‍यात येणारे हे गाव निर्मल ग्राम,
तंटामुक्त गावाचाही पुरस्कार मिळवणारे. गावातील जि.प.प्राथमिक शाळेजवळ सुधाकार मदनकर राहतात. त्यांना दोन मुले आणि केतेश्वरी नावाची अवघ्या 12 वर्षाची मुलगी.रामटेकच्या समर्थ हायस्कूलमध्ये8 व्या वर्गात शिकणारी. आता नववीत गेलेली. सतत हसतमुख, चतुर, हजरजबाबी, कोणांसही न घाबरणारी. अडचण आली असेल तर थेट शिक्षकांना विचारणारी ! केवळ शिक्षकच नाही तर मुख्याध्यापकांपर्यंत जाऊन आपली समस्या मांडणारी ही केतेश्वरी वर्गातही सर्वांच्या जिव्हाळा मिळवणारी. आईवडिलांची लाडकी. मात्र म्हणतात ना जो सर्वांना आवडतो, तो देवालाही आवडतो. बुधवारी केतेश्वरीच्या नव्या घराची वास्तुशांती होती. दिवसभर घरातील सर्वांसोबत तिने उपवास केला. दिवसभर तिची धावपळ सुरू होती. रात्री जेवण केल्यानंतर मला झोप येते असे म्हणून आपल्या जुन्याच घरात कुलर लावून झोपली. घरातील सर्वांनाच ती थकली असल्याची जाणीव असल्याने तिच्या झोपेत व्यत्यय आणण्यात आला नाही. सकाळी सर्वजण उठले, मात्र केतेश्वरी उठली नाही.

हेही वाचा : आनंदाची बातमी ! कोरोनामुळे नागपूर जिल्हयाची ही समस्या काही प्रमाणात सुटेल

नवीन घरात जाण्यापूर्वीच तिचे "जाणे'
तिच्या भावाने रूषभने तिला खिडकीतून आवाज दिला, मात्र तिची हालचाल दिसली नाही. मग तिची आई दुसऱ्या दरवाजाने त्या खोलीत गेली. आईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आवाज ऐकण्याच्या पलीकडे गेलेली होती. लगेच तिला रामटेकला ऑरेंज सिटी हॉस्पिटलला आणण्यात आले. डॉक्‍टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. रात्रीच कधीतरी तिचे प्राणोत्क्रमण झाले असावे. नवीन घरात राहायला जाण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. एक आनंदी निर्झर, हुशार विद्यार्थिनी काळाच्या पडद्याआड गेली. घरात हल्लकल्लोळ माजला. सर्वचजण ओक्‍साबोक्‍सी रडत होते. गावातील परिचित, वर्गातील मैत्रिणी सगळ्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

हेही वाचा :  मला स्पोर्ट कोटयातून नोकरी लागली असून पुणे वारियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्‍त....

"तिच्या'पार्थीवावर साश्रृ नयनांनी अंत्यसंस्कार
केतेश्वरीचा अकस्मात मृत्यु झाला होता. मात्र रामटेकवरून कोणीतरी पोलिसांना फोन करून
केतेश्वरीच्या मृत्युवर शंका व्यक्त केली. त्यामुळे रामटेक पोलिसांनी नंदापुरी येथे जाऊन तिचा मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रूग्णालयात आणला. उत्तरिय तपासणीनंतर मृतदेह तिचे आईवडिलांच्या स्वाधिन करण्यात आला. सायंकाळी केतेश्वरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.