Will file charges against people Nagpur lockdown news
Will file charges against people Nagpur lockdown news

घरीच बसा अन्यथा मिळणार दंडुक्याचा प्रसाद; रिकामटेकड्यांवर गुन्हे दाखल करणार

Published on

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाइलाजाने शहरात कठोर पावले उचलण्यात येत आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळल्यास पोलिसांच्या ‘दंडुक्याचा प्रसाद’ मिळणार आहे. अशा रिकामटेकड्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा व आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर पडता येईल, असेही पोलिस आयुक्त म्हणाले.

लॉकडाउन पोलिसांकडून अतिशय कठोरपणे राबवण्यात येणार आहे. या काळात औषध विक्रेते, प्रयोगशाळा, रुग्णालय, पोलिस, पत्रकार आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ये-जा करण्यासाठी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगावे. या काळात अत्यावश्यक सेवा व किराणा दुकान वगळून सर्व प्रकारची आस्थापना बंद राहतील.

दुचाकीवर एकच जण तर कारमध्ये चालकासह दोघांनाच परवानगी असेल. या काळात वृद्ध लोकांना लसीकरणासाठी जाता येईल व त्याकरिता त्यांना सोबत एक जण नेता येईल. लोकांना अन्नधान्य, भाजी, दूध घेण्यासाठी लांब अंतरावरील दुकानावर जाता येणार नाही. त्यांनी आपापल्या वस्तीतील दुकानातूनच ते विकत घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दारूच्या होम डिलेव्हरीची नोंद

बार, वाइन शॉप, रेस्टॉरंट, हॉटेल सर्व बंद असतील. वाइन शॉपमधून लोकांना होम डिलिव्हरी दिली जाऊ शकते. पण, त्याकरिता होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद उत्पादन शुल्क विभागाकडे करावी लागेल. त्यानंतर ज्यांना दारू पोहचवित आहे, त्यांचीही नोंद रजिस्टरमध्ये नोंद करावी लागेल. 

विमानतळ, रेल्वे, बसस्थानक सुरू 

शहरातून बाहेर ये-जा करण्यासाठी विमानतळ, रेल्वे व सरकारी बससेवा सुरू राहील. या सेवा घेण्यासाठी प्रवास करताना लोकांनी सोबत तिकीट बाळगावे. बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा त्या ठिकाणी नोंदणीकृत ऑटोंची सुविधा घेता येईल. वृद्ध नातेवाइकांना या ठिकाणी घ्यायला निघालेल्या व्यक्तीची पडताळणी करून नाकाबंदी कर्मचारी निर्णय घेतील.

रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई

करोना झाल्यानंतर लक्षणे नाहीत म्हणून रस्त्यांवर फिरणारे लोक स्वत:सोबत समाजाला धोक्यात टाकत आहेत. अशी लोक फिरताना सापडल्यास त्यांना प्रथम विलगीकरण केंद्रात पाठवण्यात येईल. तेथून बाहेर पडताच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()