तपासणी न करताच निघाला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, काय झाले असे...

file
file
Updated on

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर)  : सद्या कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यावर आळा बसण्याचे नाव नाही. अश्‍या स्थितीत प्रत्येकाच्या मनात शंकाकुशंकांनी घर केले आहे. तब्येतीच्या सामान्य तक्रारी असल्या तरी मनात शंकेची पाल चुकचुकते. गोंधळाच्या वातावरणात असाच एक प्रकार वानाडोंगरी कोरोना तपासणी केंद्रात घडला. शेवटी एका क्षुल्लक गोष्टीतून महाभारत घडले. येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आईसी चौकामधील एका सराफा व्यापाऱ्याची तपासणी न होताच अहवाल पॉझिटिव्ह आला. हा प्रकार शुक्रवारी(ता.७) उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

अधिक वाचा  : ...आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी फेकली शेतकऱ्यांची कर्जासाठीची कागदपत्रे!

डॉक्टरांनी सांगितले चाचणी करण्यास
याबाबत माहिती अशी की एमआईडीसी आईसी चौक येथे सराफा व्यापारी राहतात. गुरुवारी(ता.६) रात्री ताप आल्यामुळे शुक्रवारी सकाळी आधी त्यांच्या मोठ्या भावासोबत राजीवनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी कोव्हिड चाचणी करून घेण्यास सांगितले. त्यामुळे तेथून ते सकाळी ११ वाजता सरळ वानाडोंगरी कोविड सेंटरवर तपासणी करिता गेले. तिथे असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव, पत्ता, फोन नंबर लिहून नोंदणी केली. तपासणीकरिता दुपारी २ वाजता येण्यास सांगितले. परंतू काही कारणामुळे ते पुन्हा दुपारी तपासणीकरिता पोहचू शकले नाहीत. तरी सायंकाळी ५ वाजता त्यांना निलडोह ग्रामपंचायतमधून तुमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, असा फोन आला.
अधिक वाचा : मुलीचे लग्न मुलाच्या घरी ‘मेसेज’ पाठवून तोडले, म्हणून जन्मदात्रीने उचलले टोकाचे पाऊल....

अन् झाला घोळ !
या फोनमुळे त्या व्यापाऱ्याचे कुटुंब हादरून गेले. तपासणी न करताच अहवाल पॉझिटिव्ह कसा, हा प्रश्न घेऊन त्या व्यापाऱ्याचे मोठे बंधू ग्रामपंचायतमध्ये पोहचले व दोन ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन वानाडोंगरी कोविड सेंटरमध्ये गेले. तिथे उपस्थित डॉ.बंसोड यांना कोरोना तपासणी अहवाल मागितला व विनातपासणी अहवाल कसा पॉझिटिव्ह आला, याची विचारणा केली. डॉक्टरांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी नोंदणी रजिस्टरमध्ये चुकीने अबसेंट ऐवजी पॉझिटिव्ह लिहिले असल्याचे सांगितले व त्या व्यापाऱ्यांच्या भावाला तसे लिहून दिले.

चुकीने झाले, त्वरीत दुरुस्ती करण्यात आली: डॉ.बन्सोड
सकाळी तपासणीकरिता आल्यानंतर या व्यक्तीने आपले नाव लिहून नोंदणी केली होती. परंतू तपासणीकरिता आले नाही. सर्व तपासणी व अहवालाची यादी तयार करताना कर्मचाऱ्याने चुकीने त्या नावासमोर ‘अबसेन्ट’ ऎवजी पॉझिटिव्ह लिहिले. त्यामुळे यादी तयार करताना घोळ झाला .काही वेळातच ती चूक दुरुस्त करण्यात आली. मात्र दरम्यान ती यादी कुणीतरी निलडोहच्या अधिकाऱ्यांना पाठविली व त्या व्यापाऱ्याला चुकीचा मॅसेज गेला. सर्व दुरुस्ती काही मिनिटातच झाल्याचे हिंगणा केंद्र कोरोना तपासणी अधिकारी डॉ.रवीन्द्र बंसोड यांनी सांगितले.


संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.