भिवापूर (जि.नागपूर) : प्राकलन किंमतीच्या25 ते30 टक्के कमी दराने कंत्राट मिळवून केले जात असलेल्या रस्ते व नाल्या बांधकामात प्रचंड घोळ दिसून येत आहे. प्राकलनात ठरवून दिलेल्या मापदंडाना बासनात गुंडाळून कंत्राटदार कामे पूर्ण करीत असल्याने या सर्व बांधकामाच्या चौकशीची मागणी मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे.
स्थानिय नगर पंचायतच्या माध्यमातून शहरातील काही भागात सिमेंट रस्ते व भूमीगत नाल्यांची बांधकामे सुरू आहेत. विविध शासकीय योजनांच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असाच आहे. प्राकलनात ( ईस्टिमेटमध्ये )ठरवून दिलेल्या मापदंडांना कंत्राटदारांकडून केराची टोपली दाखवून थातुरमातूर कामे पूर्ण केली जात आहे. हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतांना त्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : मोबाईलसाठी रूसली आणि जीव गमावून बसली...
अधिकारीही भूमीगत
सिमेंट रस्ता बनविताना तो टिकावू व मजबूत व्हावा यासाठी कॉंक्रेटिंगच्या आधी करण्यात येत असलेले जीएसबीचे काम योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. त्यावर त्या रस्त्याचे आयुष्य अवलंबून असते. मात्र चार ईंचाऐवजी दिड ते दोन ईंचपर्यंतच जिएसबीची कामे केली जातात. त्याची व्यवस्थित दबाई न करता त्यावर कॉंक्रिट पसरण्यात येते. कॉंक्रिटमध्ये एका सिमेंट बॅंग मागे चार ते पाच घमेले गिट्टी व तितकेच घमेले वाळू "मिक्स' करायला हवे. परंतु या कामात एका सिमेंट बॅंग मागे 12 ते 15 घमेले गिट्टी व तेवढीच वाळू मिसळण्यात येत आहे. रस्त्यावर पसरण्यात येत असलेल्या कॉंक्रिटचा थर किमान सहा ईंच पर्यंत असणे आवश्यक असताना चार ते साडेचार ईंचच्यावर या रस्त्यांवर कॉंक्रिटचा थर दिसत नाही आहे. भूमिगत नाल्यांच्या बांधकामाची स्थितीसुद्धा रस्ते बांधकामाप्रमाणेच आहे. येथेही जिएसबीची कामे व वापरण्यात येत असलेल्या सिमेंट पायल्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचे दिसून येते. एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलविताना पायल्यांचे तुकडे पडतात तर अनेकदा त्यांना तडे जातात. त्या तशाच बांधकामात वापरल्या जात आहेत. हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना नगरपंचायत प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा :आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी खेळू नको रे....नाही तर तू पण...
देखरेख करणारी एजंसी ठरतेय "पांढरा हत्ती'
नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विविध बांधकामांची प्राकलने ( ईस्टिमेट ) तयार करणे, प्रत्यक्ष कामे सुरू असताना त्यावर देखरेख ठेवणे व काम पूर्ण झाल्यावर त्यांचे मोजमाप पत्रक
(एमबी)तयार करणे यासाठी नागपूर येथील ढोबळे नामक एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु केवळ प्राकलने तयार करण्याशिवाय ही एजंसी इतर कामे करतांना दिसत नाही. अनेकदा एमबी तयार करण्याची कामे नगरपंचायतीच्या अभियंत्याकडूनच केली जातात, तर प्रत्यक्ष कामे सुरू असतांना देखरेखीकरीता बांधकामस्थळी कुत्रही तिकडे फिरकत नाही. त्याचा ब-यापैकी फायदा कंत्राटदार घेतात.
अधिक वाचा : "महाराष्ट्रातही सरकार पाडण्याच्या हालचाली, पण...'
25 ते30 टक्के"बिलो'ने घेतात कामे
बांधकामाची कंत्राटं आपल्यालाच मिळावी यासाठी काही कंत्राटदारांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. एकूण प्राकलन किमतीच्या 25 ते30 टक्के कमी किमतीची निविदा भरायची व कामे आपल्या पदरात पाडून घ्यायची अशी ही युक्ती आहे. परवडत नसल्याने अन्य कुणी इतक्या कमी किमतीची निविदा भरत नाहीम व कंत्राटदारांचे फावते.
कंत्राटदारांचे उमरेड "कनेक्शन'
येथील नगरपंचायतच्या कामांची बहुतांष कंत्राटे उमरेड येथील कंत्राटदारांना मिळालेली आहेत. कमी दरात कंत्राट घेवून रग्गड नफा कमविण्याची कला त्यांना चांगलीच अवगत झाली आहे. नगरपंचायतच्या बांधकाम विभागाचे अभियंता पटेल हे सुद्धा उमरेडचे आहेत. त्यामुळे अभियंता उमरेडचा आणि कंत्राटदारही उमरेडचे, हा योगायोग की आणखी काही,असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.