‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...

Farmer Pramod Mondhe suicide
Farmer Pramod Mondhe suicide
Updated on

नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्याची दोन लहान मुले आणि पत्नी यांच्यावर आभाळच कोसळले आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून आणखी किती शेतकरी आत्महत्या करणार, असा प्रश्न यानिमित्त ऐरणीवर आला आहे.

प्रमोद आबाजी मोंढे (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खलासना येथे त्यांच्या नावे अडीच एकर शेती आहे. फुलशेती करून ते आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवत होता. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून फारसे पिकपाणी होत नसल्याने त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याची वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकाराने चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणे सुरू केले होते. पैशासाठी धमकीही दिली जात होती.

त्यामुळे दोन लाखांचे कर्ज दहा लाखांच्या घरात गेले होते. ही रक्कम बघून प्रमोद यांना घामच फुटला होता. शिवाय एवढी रक्कम परफेड करणे आर्थिक परिस्थितीत शक्यच नसल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यातच सावकाराने त्यांची शेतजमीन आपल्या नावे करून बळाकवली. त्यामुळे ते आणखीच खचले होते. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने कुटुंबीयांचे कसे होईल याची चिंता त्यांना सतावत होती. शेवटी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला.

मंगळवारी (ता. ४) नवव्या वर्गात शिकत असलेल्या मोठ्या मुलाला ‘आईची काळजी घे, आता तुलाच सर्व सांभाळायचे आहे', असे सांगून प्रमोद शेतात निघून गेले. वडील काय बोलले, त्यांच्या म्हणण्याचा अर्थही मुलाला कळला नाही. रात्री जेव्हा वडील घरी परत आले नाही तेव्हा मुलगा व आई शेतात शोधायला गेले. यावेळी प्रमोद गळफास लावल्याच्या अवस्थेतच त्यांना आढळले.

पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मेडिकल इस्पितळात शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमोद यांच्या नातेवाईकांनी सावकारावर कारवाई करावी आणि शेतजमीन कुटुंबीयांना मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ते निवेदन देणार आहेत.

दोन लाखांचे कर्ज दहा लाखांच्या घरात

दोन ते तीन वर्षांपासून फारसे पिकपाणी होत नसल्याने प्रमोद यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यावरही उत्पन्न न झाल्याने ते चिंतेत होते. आता परतफेड कशी करायची अशी चिंता त्यांना सतावत होती. दुसरीकडे सावकाराने चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणे सुरू केले होते. यामुळे दोन लाखांचे कर्ज दहा लाखांच्या घरात गेले होते. ही रक्कम बघून प्रमोद यांना घामच फुटला होता.

पैशासाठी मिळायच्या धमक्या

सावकाराने प्रमोद यांनी घेतलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणे सुरू केल्याने दोन लाखांचे कर्ज दहा लाखांच्या घरात गेले होते. एवढी रक्कम परफेड करणे आर्थिक परिस्थितीत शक्यच नसल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यातच सावकाराने त्यांची शेतजमीन आपल्या नावे करून बळाकवली होती. सावकाराकडून पैशासाठी धमक्याही मिळत होत्या. यामुळे गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()