पोलिस भरतीसाठी हैं तय्यार हम, पहाटेच्या वेळी मैदानांवर गजबज

Youth ready for police recruitment, start practice daily
Youth ready for police recruitment, start practice daily
Updated on

नागपूर : राज्य पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा नुकताच गृहमंत्र्यांनी केली आहे. पोलीस दलातील जम्बो भरतीमुळे युवा वर्गाला सुखद धक्का मिळाला आहे. शेकडो युवकांनी पोलिस भरतीसाठी तयारी करणे सुरू केली असून शहर आणि ग्रामीण भागातील मैदानावर प्रॅक्टिस सुरू केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलात जम्बो भरती प्रक्रिया राबविण्याला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळे महाआघाडी सरकारे थेट साडेबारा हजार जागांची पोलिस भरती घेण्याचा निर्णय घेतला. फक्त बारावी उत्तीर्णची अट असलेली नोकरी मिळविण्यासाठी अनेक युवकांनी कंबर कसली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वीचा अनुभव लक्षात घेता पोलिस शिपाई पदासाठी जवळपास ६३० इंजिनियर, ४०० पेक्षा जास्त एमबीए, १२०० पेक्षा जास्त पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश होता. लॉकडाॉउनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण होऊन त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. परिणामी शहरात तसेच ग्रामीण भागातील तरुण पोलिस भरतीसाठी जोमाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

आता आणखी स्पर्धा वाढेल

गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोलिस भरतीत केवळ ३५० जागा होत्या. त्यासाठी २८ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते. यावर्षी जम्बो भरती असल्यामुळे मोठी स्पर्धा राहणार आहे. कारण यावर्षी अनेक जण पोलीस भरतीत आपले नशीब अजमावणार आहेत. पदभरती पाहता हजारो युवक तयारीला लागले आहेत.

भरती निघाल्यामुळे समाधान
गेल्या वर्षभरापासून पोलिस भरतीची वाट पाहत होतो. चक्क साडेबारा हजार जागांवर भरती निघाल्यामुळे समाधान आहे. भरतीसाठी आतापासूनच तयारी करीत आहे. अभ्यास आणि मैदानी मेहनत मी घेत आहे.
- भारत सूर्यवंशी 

नव्या जोमाने मैदानावर
पोलिस भरतीची घोषणा होताच आनंद झाला. कोरोनामुळे मैदानी प्रॅक्टिस थांबली होती. परंतु आता पुन्हा नव्या जोमाने मैदानावर उतरली आहे. फिजिकल फिटनेस आणि प्रश्‍नसंच सोडविण्यावर मी भर देत आहे.
- मयूरी ठोंबरे  

संपादन : अतुल मांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()