हिंगणघाट (जि. वर्धा) : डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्प अंतर्गत 100 उपग्रह तयार करण्यात आले. त्याचे सात फेब्रुवारीला प्रक्षेपण करण्यात आले. त्यासाठी हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ येथील ज्ञानदा विद्यालयातील 10 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नामांकनाकरिता 13 फेब्रुवारीला निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावयाची होती. दहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे नामांकन परीक्षेसाठी अडचण तयार झाली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता शाळा व्यवस्थापनाने स्पंदन वसतिगृह हिंगणघाट येथे त्यांची वेगळी व्यवस्था केली व परीक्षा यशस्वीपणे पार पडली. परीक्षा देणारे सगळे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
देशभरातील एक हजार तर राज्यातील 354 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. जगात सर्वांत कमी वजनाचे 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम चे 100 उपग्रह बनवून आणि त्यांना पस्तीस ते अडतीस हजार मीटर उंचीवर हेलियम बलून द्वारे प्रस्थापित करण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता. ज्ञानदा विद्यालयातील पंचाहत्तर विद्यार्थी कोरोनाबाधित आले.
त्यात निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यापैकी तीन विद्यार्थी होते. संकटावर मात करीत या विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करण्यासाठी नामांकन मिळविले, हे विशेष. विद्यार्थ्यांची निवड व सहभागासाठी प्राचार्य काशिनाथ लोणारे, उपक्रमशील शिक्षक लकी खिलोसीया व शिक्षक आशीष बेंबार यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.