मोताळा - बकऱ्या चारताना अचानक पाय घसरून नदीत पडल्याने १४ वर्षीय बालकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल वीस तासानंतर आज (ता. १२) दुपारी त्याचा मृतदेह सापडला. कुणाल सिद्धार्थ इंगळे (रा. जहांगीरपूर) असे मृतकाचे नाव आहे..तालुक्यातील जहांगीरपूर येथील कुणाल सिद्धार्थ इंगळे (१४) हा बालक बुधवारी (ता. ११) गावानजीकच्या मोहगंगा नदीजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक कुणालचा पाय घसरून तो नदीपात्रात पडला व नदीतील पाण्यात बुडाला. दरम्यान, गावातील नागरिकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने कुणालचा शोध सुरू केला..बुधवारी रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवून गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू झाले. तब्बल वीस तासानंतर आज (ता. १२) दुपारी बारा वाजताच्या सुमारास मोहगंगा नदीपात्रात कुणालचा मृतदेह मिळून आला. कुणाल हा शेलगाव बाजार येथे आठव्या वर्गात शिकत होता.बुधवारी गौरी पूजनानिमित्त सुटी असल्याने तो बकऱ्या चारण्यासाठी गेल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मिलिंद जगदेव सुरडकर (रा. जहांगीरपूर) यांच्या खबरी वरून धामणगाव बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.