गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव/बाजार येथील १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई (मुख्य परीक्षा) सारख्या कठीण पात्रता परीक्षेत यश संपादन केले.
गोंदिया - जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव/बाजार येथील १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई (मुख्य परीक्षा) सारख्या कठीण पात्रता परीक्षेत यश संपादन केले. त्यांच्या यशाबद्दल काैतुक होत आहे.
यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारा घेण्यात आलेल्या जेईई पात्रता परीक्षेचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. अभियांत्रिकी पात्रता परीक्षेत नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी प्रकल्पातील १७ विद्यार्थ्यांनी अतुलनीय असे यश संपादीत केले आहे. या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी, एनआयआयटी अभियांत्रिक महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा उतीर्ण होणे अनिवार्य असते. या परीक्षेची पातळी अत्यंत कठीण समजली जाते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयांच्या उपलब्ध करून दिलेल्या नोट्सचा वापर करून एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव/बाजार या शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. त्यांच्या शिकवणीची संपूर्ण धुरा शाळेचे प्राचार्य संजय बोंतावार व विषय शिक्षकांनी सांभाळली.
प्रकल्प कार्यालयातर्फे एकूण ४० आदिवासी विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १२ मुलांनी व ५ मुलींनी जेईईची परीक्षा उत्तीर्ण केली. या उपक्रमाला अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सोनम सहाळा, अर्चना कुंभरे, प्रतीक्षा सलामे, आशीष पुराम, देवेश सयाम, गिरीश नैताम, श्रीकांत उईके, सौरव कोरेटी, रितेश उईके, गेवेंद्र भोयर, कुणाल कोकोडे, पुरुषोत्तम कलारी, टेकेश्वर भोयर, प्रशांत अलोणे, संकेत कुमडे, सोनाली कल्लो, देवेंद्र ताराम अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.