Gadchiroli : २५ लाखांची चोरबिटी जप्त;गोंडपिपरी येथे कृषी विभागाच्या पथकाची कारवाई

गोंडपिपरी पोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता. २३) रात्री बारा वाजतादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एकाला २५ लाख रुपये किमतीचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना पकडले.
Gadchiroli
Gadchiroli sakal
Updated on

गोंडपिपरी : गोंडपिपरी पोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता. २३) रात्री बारा वाजतादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एकाला २५ लाख रुपये किमतीचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना पकडले. आकाश गणेश राऊत (वय २४, रा. अहेरी, जि. गडचिरोली) असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे.

अनधिकृत चोरबिटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. कृषी विभागाने अनधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र, गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते. शेतकऱ्यांना चोरबिटी विक्री करून फसवणूक केली जात आहे. या सर्व प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग, पोलिस विभाग अलर्ट आहेत.

ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलिस कर्मचारी काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान गस्तीवर होते. यावेळी चारचाकी वाहनाने चोरबिटीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आकाश गणेश राऊत याच्या गाडी क्रमांक एमएच ३४ एम ८६३५ या वाहनाची तहसील कार्यालयासमोर तपासणी केली. यावेळी २५ लाख ८० हजार रुपये किमतीचे १२.९० क्विंटल चोरबिटी बियाणे आढळून आले. पोलिसांनी चोरबिटी वाहन जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, श्रावण बोढे, विवेक उमरे, पोलिस हवालदार देविदास सुरपाम, मनोहर मत्ते, शांताराम पाल, प्रशांत नैताम, पुनेश्वर कुळमेथे यांच्य पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com