गडचिरोली : जिल्हा दारूबंदीला आमचे समर्थन असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तंबाखू व दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता इलाख्यातील 25 गावांतून अवैध दारू व तंबाखूसारखे हानिकारक पदार्थ हद्दपार करण्याचा निर्णय जारावंडी पारंपरिक इलाखा ग्रामसभेने घेतला आहे.
जिल्हा दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी तालुक्यातील सिरपूर येथे जारावंडी पारंपरिक इलाखा ग्रामसभेची बैठक बाबूराव आतला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी इलाखा अध्यक्ष मसरू पोटावी, शिशुपाल नरोटे, रमेश दुग्गा, मानसू नैताम, ब्रिजेश नरोटे, जानू कोल्हा, डोलू कोल्हा, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांच्यासह 25 गावातील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, गाव पाटील, भूमय्या आदी उपस्थित होते. जिल्ह्यात शासकीय दारूबंदीनंतर शेकडो गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली. त्यामुळे दारूचा वापर कमी झाला. गावातील स्त्रिया व लोक संघटित होऊन गावाची दारूबंदी करीत आहेत.
त्याचप्रमाणे जारावंडी पारंपरिक इलाखा ग्रामसभेनेदेखील ठराव घेत महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करण्याची विनंती केली आहे. सोबतच इलाख्यातील 25 गावात देशी, विदेशी दारू विक्री बंद ठेवणे, पेसा कायद्याचा आधार घेत खर्राविक्रीसुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल...
सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथील दारूविक्रेत्यास 15 लिटर गुडाच्या दारूसह पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विज्जू भिमकरी (वय 35) असे दारूविक्रेत्याचे नाव आहे. ही कारवाई असरअल्ली पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या केली आहे. असरअल्ली गावात चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरूच असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. माहितीच्या आधारे असरअल्ली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने विज्जू भिमकरी याच्या घराची तपासणी केली. यावेळी 15 लिटर गुळाची दारू सापडली. संपूर्ण दारू नष्ट करीत दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चोरट्या मार्गाने दारूविक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.