अमरावती : दोन वाहनांमध्ये ३ कोटी ५० लाख रुपयांची रोकड सापडल्याप्रकरणी आयकर विभागाने (income tax department) सुरू केलेल्या चौकशीमध्ये व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर सहा व्यक्तींकडून तपासात सहकार्य मिळत नसल्यामुळे ही रक्कम परत करू नये, असा युक्तिवाद आयकर विभागाने गुरुवारी (ता. २९) न्यायालयात केला. (3 crore and 50 lakh rupees not return says income tax department)
अमरावतीच्या सहदिवाणी न्यायाधीश (५) कनिष्ठस्तर जे. जी. वाघ यांच्या न्यायालयात नागपूर आयकर विभागाच्या दक्षता पथकाच्या वतीने अॅड. प्रकाश जलतारे़, तर राजापेठ पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक मापारी यांनी स्वतंत्र पत्र दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेल्या पत्रात पैसा आला कोठून, याबाबत अधिकृत पुरावे व्यापाऱ्यांनी सादर केले नाही. त्यामुळे आयकर विभागाची चौकशी होईपर्यंत पैसा परत करू नये. शिवाय चौकशीची परवानगी पोलिसांना द्यावी, अशा आशयाचे पत्र न्यायालयात सादर केले.
आयकर विभागाच्या दक्षता पथकाच्या वतीने अॅड. जलतारे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची चौकशी केली असता, हा पैसा आला कोठून याचे समाधान कुणी करू शकले नाही. हा संपूर्ण विषय आयकर विभागाच्या अखत्यारीतील असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत पैसे परत न देता, शासकीय तिजोरीत जमा असू द्यावा, असे म्हटले.
आयकर विभागाच्या नागपूरच्या दक्षता पथकाने बुधवारी (ता. २८) पैशावर दावा करणाऱ्या व्यापाऱ्याचे सीए तसेच शिवदत्त महेंद्र गोहील, वाघेला जोराजी, रामदेव राठोर, नरेंद्र गोहील, नीलेश पटेल व जिग्नेश गिरीगोसावी आदींची याप्रकरणात चौकशी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.