मौदा - येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रिलायन्स कंपनीने सुमारे ३० एकरांत ३,५०० आंब्याची व संत्र्याची झाडे लावली होती. २०१४ पासून कंपनी बंद अाहे, तर त्या ठिकाणी असलेल्या बगिच्यात गवत वाढले होते. आठवड्याभरापूर्वी गवतासोबत झाडे जळाली. यातील काही झाडे पावसाळ्यात हिरवी होतील, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांना आहे.
१९८९ मध्ये डीसीएल पॉलिस्टर कंपनीची स्थापना झाली. १९८९-९० मध्ये शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात कंपनीने सुमारे ३५० एकर जागा खरेदी करून ठेवली होती. काही जागेत कंपनी, वसाहत, मंदिर, शाळा निर्माण करण्यात आले. उरलेल्या सुमारे १५० एकरांत शेती त्यात आंबा, संत्रा, चिकू व इतर फळांची झाडे लावण्यात आली. २००२ मध्ये मुकेश अंबानी यांनी ही कंपनी खरेदी करून रिलायन्सचे नाव दिले.
आंबराई २०१० पासून सुरू झाली. २०१४ ला येथे झाडे लावून बगीचा बंद करण्यात आला. पूर्वी येथील कामावर सुमारे १०० मजूर होते. रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा बगीचा बंद केल्यामुळे येथील कामगार बेरोजगार झाले. सर्व कामगार बंद झाल्यामुळे आंब्यांच्या झाडाभोवती गवत जमा झाले होते. बाजूला लागलेल्या या आगीने आंब्याच्या झाडांना कवेत घेतले. भंडारा व नागपूरवरून अग्निशमन गाड्या बोलवण्यात आल्या. तीन तास परिश्रम करून आग आटोक्यात आली. तोपर्यंत आंब्याची आंबराई पूर्ण जळाली होती.
२०१४ पासून बंद असलेल्या बगीच्यात ५ ते ६ फूट उंच गवत वाढलेला होते. त्यामुळे या आगीने झाडांना कवेत घेतले. वेळेवर अग्निशमन आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सफाईबद्दल रिलायन्स अधिकाऱ्यांना बोलले असता, पळवापळवीचे उत्तर मिळतात.
-जया गजभिये, सरपंच, गटग्रामपंचायत, नानादेवी
झाडांना आग लागली याचे तुम्हाला काय करायचे आहे? ही कंपनीची मालमत्ता आहे. सेक्युरिटी सुपरवायझरचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. आग लागली तेव्हा मी बाहेर होतो.
-अवदेश पतिंगे, एच. आर. हेड, रिलायन्स, मौदा
आगीमुळे आंब्याची व संत्र्याची एकूण ३,५०० झाडे जळाली. एक पाणी पडल्यानंतर झाडे जगतील, असा रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना विश्वास आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे पंचनाम्यात टाकले नाही. पंचनामा तहसील कार्यालय मौदा येथील आवक-जावकमध्ये जमा केला.
-ललिता बोळके, तलाठी, बाबदेव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.