शटडाऊनच्या तयारीत असताना मशीनमधून निघाली गरम वाफ, पार्टीकल बाहेर येताच माजला हाहाकार

38 worker injured in bhugaon uttam galva company blast wardha
38 worker injured in bhugaon uttam galva company blast wardha
Updated on

वर्धा : भूगाव येथील उत्तम गाल्व्हा कंपनीत लोखंडाचे लिक्विड स्वरुपात रुपांतर करण्याचे काम सुरू होते. वर्षातून एकवेळा दुरुस्तीसाठी हे यूनिट बंद करण्यात येते. याच कामासाठी आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हे यूनिट बंद करण्यात आले होते. पूर्णत: यूनिट बंद केल्यानंतर त्याची स्वच्छता करण्याचे काम सुरू असताना येथे उघडण्यात आलेल्या एका मशीनमधून गरम वाफ आली. त्या सोबतच काही पार्टीकल आले आणि एकच धावपळ सुरू झाली. यावेळी दोन शिफ्टचे कर्मचारी याठिकाणी कार्यरत होते. या घटनेमध्ये ३८ कामगार भाजले असून  यातील २८ जणांना सावंगी (मेघे) तर १० जणांना सेवाग्राम रुग्णालयात हलविल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये वर्ध्यासह बाहेर जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट - 
या घटनेची महिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जिल्हा शल्य चिकित्यक डॉ. सचिन तडस, वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी घटनास्थळाला भेट देत  माहिती घेतली. शिवाय सर्वच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. 

खासदारांनी साधला संवाद -
खासदार रामदास तडस यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दिल्ली येथून पोलिस अधीक्षक आणि सावंगी ठाणेदार यांच्या सोबत बोलणे केले. सदर घटनेची सर्व माहिती घेतली आणि जखमींवर चांगले उपचार करावे काळजी घ्यावी आणि सदर घटनेची चौकशी करावी, अशा सूचना केल्या. तसेच भूगाव कंपनी व्यवस्थांसोबतसुद्धा बोलणे करून जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनी मार्फत करावा आणि जखमींच्या घरच्यांना मदत करावी अशा सूचना त्यांनी केल्या. 

मेंटेनन्ससाठी हे युनिट बंद करण्यात आले होते. याच काळात यंत्रांची दुरूस्ती करताना हा अपघात झाला. यात ३८ कामगार जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या जखमी कामगारांच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनी करणार आहे. 
- आर. के. शर्मा, कंपनी प्रशासन, भूगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()