Heat Stroke News : खेर्डा येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

कारंजा अमरावती मार्गावरील खेर्डा येथे मंगळवारी १६ एप्रिल ला एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नारायण रामदास कडू असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मुर्तीजापुर तालुक्यातील बीडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
heat stroke
heat strokesakal
Updated on

Heat Stroke News : कारंजा अमरावती मार्गावरील खेर्डा येथे मंगळवारी १६ एप्रिल ला एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नारायण रामदास कडू असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मुर्तीजापुर तालुक्यातील बीडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार मृतक नारायण कडू हा खानापूर येथे एका लग्न समारंभासाठी आला होता त्यानंतर तो खेर्डा येथे आला व तेथे त्याचा मृत्यू झाला. गावातील काही जणांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. तीव्र उन्हामुळे व अति मध्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला अशी चर्चा परिसरात ऐकावयास मिळाली. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलिसांनी सदर घटने संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात संतोष कोहर करीत आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.

heat stroke
Death Due to Sun Stroke: उष्माघाताचे शहरात दोन बळी? प्राथमिक अहवालातून माहिती समोर, नागपुरातील पारा ४१ अंशावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.