Tadoba National Park : ताडोबात ५५ वाघ, १७ बिबटे;ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये निसर्गानुभव

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग अनुभव उपक्रम राबविण्यात आला. यात कोर व बफर क्षेत्रात ५५ वाघ, १७ बिबटे आढळून आले. यासोबतच ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १ हजार ४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे असे एकूण पाच हजार ६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली.
Tadoba National Park
Tadoba National Park sakal
Updated on

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग अनुभव उपक्रम राबविण्यात आला. यात कोर व बफर क्षेत्रात ५५ वाघ, १७ बिबटे आढळून आले. यासोबतच ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १ हजार ४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे असे एकूण पाच हजार ६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली.

बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहुर्ली, पळसगाव, खडसंगी, शिवणी या सहा वनपरिक्षेत्रांत ७९ मचाणी उभारल्या होत्या. या मचाणींवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसोबत प्राणी गणना केली. याशिवाय कोर विभागातील पाच वनपरिक्षेत्रांत ७६ मचाणींवर प्राणी गणना करण्यात आली. या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात २६ वाघांची व ८ बिबट्यांची नोंद झाली.

कोर क्षेत्रात २९ वाघ आणि नऊ बिबट्यांची नोंद झाली. बफर क्षेत्रात १७ रानकुत्रे, ३२ अस्वल, ४०३ चितळ, १६६ सांबर, ३४४ गवे असे सर्व मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी मिळून एकूण १,९७७ प्राण्यांची नोंद झाली. कोर क्षेत्रात २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ गवा, १०५५ चितळ, ३२२ सांबर असे सर्व मिळून ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५,०६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे. बफर क्षेत्रात निसर्गप्रेमींच्या सहभागातून, तर वन कर्मचा-यांच्या सहभागातून कोर क्षेत्रात निसर्गानुभव कार्यक्रम झाला.

हा उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक कोर काळे व बफर कुशाग्र पाठक यांच्या सूचनेनुसार पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com