Wardha News : पाच वर्षांत रोखले ६६ बालविवाह;कायदा असतानाही जिल्ह्यात अनेकवार उल्लंघन ,शासनाच्या प्रतिबंधात्मक योजना थिट्या

बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असताना अनेकांकडून या कायद्याचे उल्लंघन करून जिल्ह्यात बालविवाहाचे आयोजन होत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाला होत असलेल्या बालविवाहाची माहिती मिळताच त्यांच्याकडून तो रोखण्याचे प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात गत पाच वर्षांत तब्बल ६६ बालविवाह रोखण्यात आले आहे.
Wardha News : पाच वर्षांत रोखले ६६ बालविवाह;कायदा असतानाही जिल्ह्यात अनेकवार उल्लंघन ,शासनाच्या प्रतिबंधात्मक योजना थिट्या
Updated on

वर्धा : बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असताना अनेकांकडून या कायद्याचे उल्लंघन करून जिल्ह्यात बालविवाहाचे आयोजन होत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाला होत असलेल्या बालविवाहाची माहिती मिळताच त्यांच्याकडून तो रोखण्याचे प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात गत पाच वर्षांत तब्बल ६६ बालविवाह रोखण्यात आले आहे.

बालविवाहाची प्रथा मागास असलेल्या समाजात असल्याने त्यांच्याकडून विवाह करून जागा सोडण्याची प्रथा असल्याने अनेक विवाह जिल्हा यंत्रणेच्या नजरेतून सुटल्याचे नाकारता येत नाही. बालविवाह रोखण्याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्या जनजागृतीचा विशेष लाभ होत नसल्याने जिल्ह्यात होत असलेले बालविवाह कायम असल्याची ओरड होत आहे. शासनाकडून जनजागृतीच्या कामावर विशेष लक्ष देत होत असलेले बालविवाह रोखण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले होते. वाढलेले हे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल १० बालविवाह रोखण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही बालविवाहाचे सत्र सुरू आहे. हे प्रकार रोखण्याकरिता शासनाने स्वतंत्र योजना आखल्यास त्यावर आळा घालणे शक्य होईल असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात मध्यंतरी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या माध्यमातून मिळत असलेल्या माहितीवरूनच हे विवाह रोखण्यात यश येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात रोखलेले बालविवाह

  • २०१९-२० ०१

  • २०२०-२१ १७

  • २०२१-२२ २१

  • २०२२-२३ ०८

  • २०२३-२४ ०९

  • २०२४-२५ १०

(एप्रिल-मे)

सन २०२१-२१ मध्ये सर्वाधिक यश

कोरोना काळात बालविवाहाचे प्रकार वाढले होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने सतर्क राहून अनेक ठिकाणी माहिती मिळताच छापे घातले. यात काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. या काळात सर्वाधिक २१ बालविवाह रोखण्यात आले आहे. बालविवाह करणाऱ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.