बर्थ-डे पार्टीला गेला..आणि आमदाराच्या मुलाचा मृतदेह दरीत सापडला

बर्थ-डे पार्टीला गेला..आणि आमदाराच्या मुलाचा मृतदेह दरीत सापडला
Updated on

वर्ध्यात सेलसुरा शिवारातील जुन्या आणि नवीन पुलाच्यामध्ये दरीत ४० फूट कोसळल्याने भीषण अपघात झाला. देवळीहून वर्ध्याला परत येत असताना झायलो कार पुलावरून नदीत कोसळल्याचं समोर आलं. मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (7 died in Wardha accident))

या भीषण चारचाकी अपघातात भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात जणांना वाढदिवसाची पार्टी महागात पडली.(Accident in Wardha)

'वाढदिवसाच्या पार्टीला जातो...' असं म्हणाला..आणि घरी आला मृतदेह!

वाढदिवसाच्या पार्टीला जातो, असं सांगून घराबाहेर पडलेल्या अविष्कारचा मृतदेहच घरी आला. त्याच्यासोबत अन्य सहा मित्रही होते. ही सर्व मुलं 21-22 वर्षांची आहेत. आमदार विजय रहांगडाले यांच्या एकूलत्या एक मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्यानंतर शोककळा ओढावली आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या मनोहरभाई पटेल सैनिकी विद्यालयात घेतले होते.

पदवीपर्यंतचे शिक्षणही जिल्ह्यातूनच झाले. सध्या तो वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मृतदेह आणल्यानंतर स्वगावी खमारी येथील स्मशानभूमीत अविष्कारवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

मृत मित्र महाराष्ट्राबाहेरचे

  • निरज चौहान (वय 22, रा. गोरखपुर, उ. प्रदेश),

  • अविष्कार विजय रहागडाले (वय 21 रा. गोंदिया),

  • नितेशसिंग (वय 25, रा. ओडिशा)

  • विवेक नंदन (वय 23 रा. गया, बिहार)

  • प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय 23 रा. गोरखपुर, उ.प्रदेश),

  • शुभम जयस्वाल (वय 23 रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश),

  • पवनशक्ती (वय 19, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परत येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.