चंद्रपूर जिल्ह्यातील 97 टक्के शाळा सुरू; ५ हजाराहून अधिक शिक्षकांची कोरोना चाचणी 

97 precent schools in chandrapur started
97 precent schools in chandrapur started
Updated on

चंद्रपूर : मागील आठवड्यापासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्याआधी शाळा, कॉन्व्हेंटला शिकविणाऱ्या शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक होती. शनिवारपर्यंत पाच हजार 865 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चाचणी केली. त्यातून सतरा शिक्षक बाधित आढळून आले. ज्या ठिकाणचे शिक्षक बाधित आढळून आले. त्या शाळा अजूनही सुरू करण्यात आल्या नाही. जिल्ह्यात 97 टक्के शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या प्रार्श्‍वभूमीवर यंदा शाळेचे सत्र लांबणीवर पडले. 23 नोव्हेंबरपासून नववी ते 12 वीचे वर्ग, वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. टप्पेनिहाय लॉकडाउन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता मिशन बिगीन अगेनअंतर्गत शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश प्राप्त झाले होते. आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले.

 त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व व्यवस्थापनांना पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. पाचवी ते आठवीतील शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-19 साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. जवळपास न हजार 46 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही चाचणी करायची होती. 

शनिवार (ता.30) पर्यंत जिल्ह्यातील पाच हजार 865 जणांनी चाचणी केली. त्यातून सतरा शिक्षक बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील 97 टक्के शाळा आता सुरू झाल्या आहे. विद्यार्थी संख्याही हळूहळू वाढत चालली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.