Cotton Price : कापसाच्या दरात एक हजाराची घसरण! प्रतिक्विंटल साडेसात हजारांवर भाव

Cotton rates
Cotton ratessakal
Updated on

यवतमाळ : यंदा कापसाचे दर आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. आठ हजार तीनशे रुपयांवरून कापसाचे दर सध्यास्थितीत साडेसात हजारांवर आले आहेत. दर वाढतील, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कापूस अजूनही घरातच ठेवला आहे. दर वाढण्याऐवजी सतत घसरण होत असल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे.

Cotton rates
Political News : माजी आमदार आशिष देशमुख 'सावनेर'च्या मार्गावर! चर्चांना उधाण

यंदा कापूस हंगामात कापसाचे दर आठ हजार तीनशे रुपयांच्या पुढे सरकलेले नाहीत. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकर्‍यांनी कापसाची विक्री थांबविली आहे. कापसाचे दर दहा हजारांवर जातील, अशी अपेक्षा कापूस उत्पादकांना होती. मात्र, दर वाढण्याऐवजी सातत्याने घसरत आहेत. यंदा

सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. त्यातच कापसाचे दर दहा हजार रुपयांवर गेलेच नसल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिराश झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली तेजी पाहता कापसाचे दर वाढण्याची शक्यता होती. कापसाचे दर वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. त्यामुळेच शेतकर्‍यांनी कापसाची विक्री थांबविली होती.

दर वाढण्याऐवजी घसरल्याने ऐन हंगामात बाजारात विक्रीला येणार्‍या कापसाची आवक मंदावली होती. या हंगामात कापसाचे दर साडेआठ हजार रुपयांच्या वर गेले नाही. काही दिवसांत वाढलेले दर आठ हजारांवर आले होते. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर आठ हजार ते आठ हजार तीनशे या घरातच खेळत होते.

Cotton rates
Weather Forecast : राज्यात अकोला सर्वात ‘हॉट’; तापमान ४५ अंशापार

दर कोसळल्याने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे. आता पुन्हा दरात घसरण झाली आहे. आठ हजार तीनशे रुपयांवर गेलेले दर सध्या साडेसात हजार रुपयांवर आले आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने शेतकर्‍यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरविली आहे. गेल्या काही महिन्यांत कापसाच्या दरात एक हजार रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे. दर घसरल्याने शेतकरी अजूनही कापूस विकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

'कापसाचे दर दहा हजारांवर जातील, अशी अपेक्षा होती. यंदा कापसाला साडेआठ हजार रुपयांवर भाव मिळाला नाही. आता तर सात हजार पाचशे रुपयांवरच दर आले आहेत. दर घसरल्याने शेतकर्‍यांची आणखी आर्थिक कोंडी होत आहे. अजूनही अनेक शेतकर्‍यांचा कापूस घरातच आहे.'

-किशोर तांगडे, शेतकरी, बोरी (चंद्रशेखर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.