चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न

चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न
Updated on

गडचिरोली : राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातली प्रभावी दारूबंदी (Effective alcohol ban in Gadchiroli district), बिहारमधील दारूबंदीपासून शिकून चंद्रपूरमध्ये देखील यशस्वी दारू नियंत्रण करायला हवे. दारूबंदी उठविणे ही अयशस्वी सरकारची कबुली (Confession of a failed government) आहे. चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी ‘असफल’ झाली असे निमित्त देऊन दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अयोग्य व दुर्दैवी निर्णय आहे, असे मत डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी व्यक्त केले. (Abhay bang asked Questions, Chandrapur liquor ban failed or ministerial and rule fails?)

दारूबंदीसाठी जिल्ह्यातील एक लाख महिलांनी आंदोलन केले. ५८५ ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेचा ठरावामुळे सरकारने सहा वर्षांपूर्वी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हेही तितकेच खरे आहे. दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला व आता सरकारचा निर्णय करवून घेतला, असेही अभय बंग म्हणाले.

चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न
वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

दारूबंदी उठविण्याचे परिणाम काय होतील? जिल्ह्यात एक हजार कोटींची अधिकृत व पाचशे कोटींची अनधिकृत दारू दरवर्षी विकली जाईल. पंधराशे कोटींचे दारू-सम्राट निर्माण होतील. चार लाख पुरुष दारू पितील, १,५०० कोटी रुपये त्यावर उडवतील. त्यांच्या कुटुंबांचे काय होणार? जवळपास ८०,००० व्यसनी निर्माण होतील. त्याला जबाबदार कोण? व्यवस्था काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

स्त्रियांच्या दु:खाचा सागर जन्माला येईल

दारूबंदी उठवल्यामुळे स्त्रियांवर अत्याचार, गुन्हे, बलात्कार, मारपिटीचे प्रमाण वाढेल. त्याला कोण जबाबदार राहील? दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात चंद्रपुरातून दारू आयात होईल. ती कोण व कशी थांबवणार? दु:ख एवढेच की या अपयशातून जिल्ह्यात दारू साम्राज्य व स्त्रियांच्या दु:खाचा सागर जन्माला येईल, असेही अभय बंग म्हणाले.

चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न
फेसबुकने मान्य केले केंद्र सरकारचे नियम; माहिती देण्यास दर्शवली सहमती

अंमलबजावणी नीट होत नाही तर नीट करा

सरकारच्या कोणत्या योजनेची व कायद्याची अंमलबजावणी शंभर टक्के होते? मग सर्व योजना व कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. ते ही थांबवणार? अंमलबजावणी नीट होत नाही तर नीट करा! त्यासाठीच शासन व मंत्री आहेत. दारूबंदीची अंमलबजावणी शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात चांगली होते. बिहारमध्ये चांगली होते. मग चंद्रपुरात का करता येत नाही? की ती करायचीच नाही?

(Abhay bang asked Questions, Chandrapur liquor ban failed or ministerial and rule fails?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.