सासूबाईंच्या हॉस्पिटलमध्ये सून करायची गर्भपात; आरोपी किती?

आरोपी मुलगा व आई-वडिलांनी धमकावून केला गर्भपात
abortion
abortion
Updated on

आर्वी (जि. वर्धा) : तेरा वर्षीय बालिकेच्या गर्भपातप्रकरणी (Abortion) आता नवनवी माहिती पुढे येत आहे. हॉस्पिटलमध्ये अर्भकाच्या ११ कवट्या व ५४ हाडे (11 skulls and 54 bones) मिळून आली. मात्र, रजिष्टरमध्ये गर्भपाताच्या फक्त आठच नोंदी आहे. यामुळे उर्वरित तीन कवट्या कुणाच्या? हा तपासाचा भाग आहे. डॉ. रेखा कदम (Dr. Rekha Kadam) यांची सासू डॉ. शैलजा कदम यांच्याकडे गर्भपात करण्याचा परवाना आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्येच अवैद्य गर्भपाताचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणात आरोपी एकटीच आहे की घरामधील आणखी लेक सहभागी आहेत, याचा तपास केला जाणार आहे. (Abortion case of a thirteen year old girl in Wardha)

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा गर्भपात (Abortion) करायचा असल्यास पोलिसांना माहिती देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांना माहिती दिली गेली नाही. मिळालेले अर्भकांचे अवशेष किती महिन्यांचे होते? लिंग चाचणी होऊ शकते काय? गरोदर माता कोण होत्या? याची माहिती डीएनए परीक्षणाद्वारे मिळू शकते. याचा तपास करण्यासाठी विशेष पथक करणार आहे.

abortion
१३ वर्षांच्या मुलीचा गर्भपात; महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या

रुग्णालयाने ठेवलेल्या रेकॉर्डमध्ये अनेक तृट्या आहेत. वेगवेगळ्या रजिष्टरमध्ये वेगवेगळ्या नोंदी आहेत. एसओपी टाळण्यात आला आहे. गर्भपात (Abortion) प्रकरणी नेमका कोणत्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे? यामध्ये डिस्पोजल ऑफ बायलॉजिक वेथ पण लागू शकतो काय? याशिवाय कोणता कायद्याचे उल्लंघन झाले हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत तपास सुरूच राहणार, अशी माहिती वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

रविवारी (ता. नऊ) अल्पवयीन तेरा वर्षीय मुलगी आई आणि मावशीसह पोलिस ठाण्यात आली आणि गर्भपात केल्याचे सांगितले. आरोपी मुलगा व आई-वडिलांनी धमकावून गर्भपात करण्यास बाध्य केल्याचे सांगितले. डॉ. रेखा कदम यांनी गर्भपातासाठी तीस हजार रुपये घेतले. यानंतर पोलिसांनी डॉ. कदमला ताब्यात घेतले. तपासात डॉ. रेखा कदमने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी डॉ. कदम (Dr. Rekha Kadam), मुलाचे आई-वडील व गर्भपाताच्यावेळी मदत करणाऱ्या नर्सला अटक केली आहे.

abortion
‘आम्हाला सोबत न घेतल्यास काँग्रेसला दहा जागाही मिळणे कठीण होईल’

तीन कवट्या कुणाच्या?

प्रकरणाचा तपास सुरू असताना बुधवारी पोलिसांना हॉस्पिटलच्या मागण्या बाजूला असलेल्या गोबर गॅस प्लॅन्टमध्ये ११ मानवी कवट्या व ५४ हाडे (11 skulls and 54 bones) आढळली होती. रुग्णालयातील नोंदणी रजिष्टर जप्त केल्यानंतर आठ जणांचेच गर्भपात केल्याचे समजले. इतर तीन गर्भपाताची नोंद का करण्यात आली नाही? गर्भपात केले तर नोंद का केली नाही? याचा पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.