१३ वर्षांच्या मुलीचा गर्भपात; महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या

कदम हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून गर्भपाताचा अवैध धंदा सुरू होता
Crime
Crimesakal media
Updated on

आर्वी (जि. वर्धा) : तीस हजारांच्या हव्यासापोटी महिला डॉक्टरने १३ वर्षांच्या शाळकरी मुलीचा अवैधरित्या गर्भपात (Abortion of a girl) केला. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवर डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून (Female doctor arrested) सोमवारी (ता. १०) अटक करण्यात आली. डॉ. रेखा कदम, किशोर सहारे, नलू सहारे अशी आरोपींचे नावे असून, अल्पवयीन मुलाचा सुद्धा यात समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई व वडील मजुरी करतात. पाच ते सहा महिन्यांपासून मुगली शाळेत गेली नाही. घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने यादरम्यान तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. रविवारी तिने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. आईने डॉ. गुल्हाणे यांच्याकडे तपासले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले.

Crime
लईच भारी! एकाच प्रभागात सख्ख्या जावा आमनेसामने; रंगतदार लढत

मुलीच्या आईने मुलाच्या आई-वडिलांना याची माहिती दिली व तक्रार करण्यासाठी निघाली. मात्र, मुलाच्या आई-वडिलांनी मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच गर्भपात (Abortion of a girl) करण्यासाठी डॉ. कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात करण्यासाठी तीस हजारांची मागणी केली. मुलाच्या आई-वडिलांनी पैसे दिले.

मंगळवारी (ता. ४) मुलीला रुग्णालयात भरती केले. डॉ. रेखा कदमने उपचार सुरू केला. गुरुवारी (ता. सहा) भल्यापहाटे चार वाजताच्या सुमारास मुलीचा गर्भपात झाला. गर्भपात केल्यानंतरही आरोपींनी मुलीच्या आई-वडिलांना धमक्या देणे सुरूच ठेवले. यामुळे त्यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉ. रेखा कदम, किशोर सहारे, नलू सहारे व अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अटक (Female doctor arrested) केली.

Crime
‘जिनांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतील; ते आमच्यासाठी निरुपयोगी’

अनेक वर्षांपासून सुरू होता अवैध धंदा

कदम हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून गर्भपाताचा अवैध धंदा सुरू होता. पोलिसांनी सखोल तपास केल्यास अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिस रविवारी कामी लागली. मात्र, कदम हॉस्पिटल रात्री नऊनंतर बंद झाले होते. हॉस्पिटलची लाइटसुध्दा बंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर खडा पहारा देऊन सोमवारी सकाळी डॉ. रेखा कदम यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय समक्ष हजर केले असता न्यायाधीश अडोणे यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.